‘माझा छळ होतोय…’ फेमस अभिनेत्रीचा थरकाप उडवणारा आरोप, कॅमेऱ्यासमोर फोडला हंबरडा

Tanushree Dutta Crying Video : ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून चाहत्यांच्या (Bollywood News) मनात खास स्थान निर्माण करणाऱ्या तनुश्री दत्ताला कोण ओळखत नाही. सध्या तनुश्री तिच्या वैयक्तिक आयुष्यातील बाबींमुळे चर्चेत आहे.बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने (Tanushree Dutta) दावा केला आहे की, गेल्या 4 ते 5 वर्षांपासून तिच्याच घरात तिचा छळ केला जात आहे. तिला मंगळवारी पोलिसांना फोन करावा लागला. पोलिसांनी येऊन तिला योग्य पद्धतीने तक्रार (Entertainment News) दाखल करण्यास सांगितले.
नराधमांची क्रूरता! महादेव मुंडेंच्या शरीरावर 16 वार, गळा 20 सेमी खोल कापला, श्वसननलिका फाडली…
व्हिडिओमध्ये तनुश्रीने सांगितले की, ती आज पोलीस स्टेशनमध्ये (Tanushree Dutta Harassed Allegations) जाऊन तक्रार दाखल करणार आहे. तिची तब्येत सध्या ठीक नाही. तनुश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूप रडताना दिसत आहे.
शोषण होत असल्याचा आरोप
तनुश्रीने व्हिडिओ शेअर म्हटलंय की, मी या छळाला कंटाळली आहे. हे 2018 पासून सुरू आहे. आज कंटाळून मी पोलिसांना फोन केला. कृपया कोणीतरी मला मदत करा. खूप उशीर होण्यापूर्वी काहीतरी करा. तनुश्रीने कॅमेऱ्यासमोर रडत विनवणी केली आणि म्हणाली, माझ्या स्वतःच्या घरात माझे शोषण होत आहे. माझ्या स्वतःच्या घरात माझा छळ होत आहे. मी आज पोलिसांना फोन केला.
View this post on Instagram
व्हिडिओ व्हायरल
तनुश्रीच्या या व्हिडिओने खळबळ उडवून दिली आहे. खूप उशीर होण्यापूर्वी कृपया कोणीतरी मला मदत करा. या समस्येतून बाहेर काढा. मी घरी मोलकरीण ठेवू शकत नाही, माझी हेरगिरी केली जात आहे. याशिवाय, तनुश्री दत्ताने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 2018 च्या मी टू मोहिमेचाही उल्लेख केला आहे. या संपूर्ण व्हिडिओ दरम्यान तनुश्रीने कोणाचेही नाव घेतले नाही.
यानंतर, तनुश्री दत्ताने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये पूर्णपणे अंधार आहे. पण विचित्र आवाज येत आहेत. तिने सांगितले की, असे आवाज अनेकदा ऐकू येतात. तिला त्रास दिला जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.