मैत्री की पैसे? उलगडणार मित्रांची अनोखी कथा; ‘संगी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

मैत्री की पैसे? उलगडणार मित्रांची अनोखी कथा; ‘संगी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Sangee Movie Trailer Launch : अर्मोक्स फिल्म्स आणि यंत्रणा फिल्म्स निर्मित सुप्रीम मोशन पिक्चर्स आणि सत्यम ज्वेलर्स प्रस्तुत ‘संगी’ या हिंदी (Sangee Movie) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या टिझरने आधीच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली होतीच आता ट्रेलरमधून चित्रपटाचा मनोरंजक प्रवास अधिकच समोर आला आहे. हलकीफुलकी कथा, मैत्रीतील गोडवा आणि हास्याचा अफाट डोस यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडेल, हे नक्की!

‘संगी’ची कथा तीन मित्रांभोवती फिरताना दिसते. या तिघांच्या आयुष्यातील बालपणापासूनचे गंमतीशीर,आनंददायी क्षण यात हलक्याफुलक्या शैलीत मांडण्यात आले आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मैत्री, पैसे आणि त्यातून येणारे रंजक वळण दिसते. आता ही मैत्री आणि पैसे हे नेमके काय प्रकरण आहे याचे उत्तर चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे. ‘संगी’ हा चित्रपट १७ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Javed Akhtar : ‘एशियन कल्चर’ पुरस्काराने गीतकार जावेद अख्तर सन्मानित, किरण शांताराम यांच्या झाला गौरव

चित्रपटाचे दिग्दर्शक सुमित कुलकर्णी म्हणतात, ‘संगी’ हा चित्रपट मित्रांच्या फक्त गंमतीजंमतीचीच गोष्ट नाही तर मैत्रीची खरी खोली उलगडणारी कथा आहे. हलक्याफुलक्या विनोदांमधूनच आम्ही प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडणारी कथा सादर केली आहे. तीन मित्रांची ही कथा प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करेल याची मला खात्री आहे. प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की पाहावा.”

follow us
  • fb
  • instagram
  • youtube