Dhruv Rathee Video Banned: हायकोर्टाने युट्यूबर ध्रुव राठीला फटकारलं! म्हणाले, सात दिवसांत रिअल ज्यूसचे फोटो…

Dhruv Rathee Video Banned: हायकोर्टाने युट्यूबर ध्रुव राठीला फटकारलं! म्हणाले, सात दिवसांत रिअल ज्यूसचे फोटो…

Dhruv Rathee Video Banned : कलकत्ता उच्च न्यायालयाने (Calcutta High Court) 15 मार्च 2023 रोजी आपच्या समर्थक आणि युट्यूबर (Youtuber ) ध्रुव राठी (Dhruva Rathi) याला FMCG कंपनीच्या डाबरच्या रियल ज्यूसची जाहिरात करणार्‍या व्हिडिओ काढून टाकण्याचे निर्देश दिले आहे. ध्रुव राठीने 13 फेब्रुवारी 2023 रोजी यूट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये पॅकिंग केलेल्या ज्यूस पॅकेटचे ब्रँड नाव लपवले आहे, अशा प्रकारची टिप्पणी त्याच्यावर करण्यात आली आहे.

कोलकाता उच्च न्यायालयाने त्या व्हिडिओमधून रियल ज्यूसचे सर्व संदर्भ काढून टाकण्यास सांगितले आहे आणि आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली. राठीने पॅकेज केलेल्या ज्यूस पॅकेटचे ब्रँड नाव लपवले असले तरी पॅकेजिंगचे इतर भाग स्पष्टपणे दिसत होते. यावरून हे स्पष्ट झाले की राठीने संपूर्ण व्हिडिओमध्ये डाबरच्या रिअल ज्यूसची फोटो वापरली होती. यावर डाबरने कंपनीने आक्षेप घेतला.

15 फेब्रुवारी 2023 रोजी, व्हिडिओ यूटुबर प्रकाशित झाल्यानंतर २ दिवसांनी, डाबरने कंपनीने राठी यांना व्हिडिओ काढण्यासाठी पत्र पाठवण्यात आले. त्याने 17 फेब्रुवारी 2023 रोजी त्या पत्राला त्याने उत्तर पाठवले, व्हिडिओ काढण्यास नकार दिला आणि दुसऱ्या दिवशी तो व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला. त्यानंतर कंपनीने कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल करून व्हिडिओ हटवण्याचे निर्देश द्यावे, अशी विनंती न्यायालयाला केली.

डाबरच्या याचिकेत राठी यांनी कार्बोनेटेड पेये आणि फळांचे रस तसेच कॅन केलेला रस आणि ताजे रस यांच्यात अयोग्य तुलना केल्याचे म्हटले आहे. कंपनीने म्हटले आहे की पोस्ट केलेल्या व्हिडिओचा एकंदर प्रभाव सर्व पॅकेज केलेले पेये सारखेच दाखवले होता. व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की पॅकबंद फळांच्या रसाचे सेवन हानिकारक आहे, कारण यामुळे मधुमेह, केस गळणे इत्यादी प्रकारचे आजार होतात. राठी यांनी लोकांना पॅकेज केलेले फळांचे रस न घेण्यास सांगितले आणि ते मुलांना न देण्याचा सल्ला दिला. त्या व्हिडिओमधून दिला होता.

Bholaa Box Office Collection: ‘भोला’ची ग्रँड ओपनिंग! पहिल्याच दिवशी कमावले 11.50 कोटी

डाबर कंपनीने पुढे सांगितले आहे की, व्हिडिओ ‘रिअल’ या ब्रँड नावाखाली विकल्या जाणार्‍या उत्पादनांचा स्पष्ट आणि थेट संदर्भ दिला आहे. कंपनीने सादर केले की राठीने मुद्दाम आणि खोडकरपणे नोंदणीकृत चिन्ह, लोगो, रिअल फ्रूट अस्पष्ट केले आणि थेट उत्पादनाला लक्ष्य केले. यामुळे त्याची त्या उत्पादनाची प्रतिमा डागाळली आहे. न्यायालयाने डाबरशी सहमती दर्शवली आणि सांगितले की व्हिडिओमध्ये दर्शविलेले उत्पादन याचिकाकर्त्याचे खरे उत्पादन आहे.

न्यायालयाने दिलेल्या निकालात नमूद केले की ध्रुव राठीने रियल ब्रँडचे उत्पादन पॅकेजिंग, लेबल आणि लोगोचा अनधिकृत वापर करून ट्रेड मार्क्स कायदा 1999 च्या कलम 29(9) आणि कॉपीराइट कायदा 1957 चे उल्लंघन केले आहे. त्यामुळे डाबरला दिलेल्या ट्रेडमार्क आणि कॉपीराइट संरक्षणाचे उल्लंघन होत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने म्हटले की, व्हिडिओमधील मजकूर आक्षेपार्ह नसला तरी, खऱ्या उत्पादनाचा वारंवार थेट संदर्भ देऊन त्याने लक्ष्मणरेखा ओलांडली आहे. न्यायमूर्ती रवि कृष्ण कपूर म्हणाले, माझ्या विचारानुसार याचिकाकर्त्याचे उत्पादनाच्या व्हिडिओला विशेषतः लक्ष्य करण्यात आले आहे आणि व्हिडिओमध्ये त्यांची बदनामी करण्यात आली.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, 10 वी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

न्यायालयाने सांगितले की ध्रुव राठीला व्हिडिओ प्रसारित करण्याची परवानगी आहे, परंतु त्यासाठी त्याला व्हिडिओमधील चुकीची माहिती किंवा लोगो इत्यादी गोष्टी काढून टाकावे लागणार आहेत. आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी 7 दिवसांचा अवधी ​न्यायालयाने दिला आहे. तसे न केल्यास न्यायालय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला व्हिडिओ ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 मार्च 2023 रोजी होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube