Manipur Violence प्रकरणावरून सेलिब्रिटींनी सरकारला फटकारलं; म्हणाले…
Manipur Violence: मणिपूरमधील दोन महिलांच्या नग्न धिंड प्रकरणावर संपूर्ण देशभर पडसाद उमटत असल्याचे दिसून येत आहे. मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यावर त्याचे देशभर तीव्र पडसाद उमटत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या अडीच महिन्यांपासून मणिपूर हिंसाचाराबद्दल मौन बाळगलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील यावर पहिल्यांदाच सडेतोड भूमिका हाती घेतली आहे, अत्याचाऱ्यांना कदापि माफ करणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
जब रक्षक ही भक्षक बन जाते हैं तो न्याय मिलना असंभव है। जिनकी देख-रेख में ४ मई को यह जघन्य अपराध किया गया, वो ही अब अचानक जग गए और उन हजारों पापियों में से किसी एक को गिरफ्तार किया, ताकी लोग किसी तरह इस शर्मसार करनेवाले कुकर्म को भूल जाए। इनका ज़मीर मर चुका है. बेशर्मी जिंदाबाद। https://t.co/4MEc0FGd8A
— Renuka Shahane (@renukash) July 20, 2023
४ मे रोजीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाल्यावर गुरुवारी त्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. त्यावर आता सिनेसृष्टीमधील अनेक सेलिब्रिटींच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया समोर येत आहेत. या अटकेच्या कारवाईवर अभिनेत्री रेणुका शहाणे हिने देखील ट्विट केले आहे.
उनको अभी भी ढेले भर की शर्म नहीं है कि उनके राज में mob-violence अपने चरम पर है। उन्हें बस इस बात का ग़ुस्सा है कि internet shutdown के बावजूद उनके समर्थन वाली भीड़ के कुकर्मों का विडियो बाहर आ गया और अब उन्हें नक़ली कार्यवाही करनी पड़ेगी।
— वरुण 🇮🇳 (@varungrover) July 20, 2023
‘जेव्हा रक्षकच भक्षकच बनतात, तेव्हा न्याय मिळणं अशक्य…’ ४ मे दिवशी ज्यांच्या देखरेखीखाली हा जघन्य अपराध घडला, ते अचानक जागे झाले आणि त्यांनी त्या हजारो पापी लोकांपैकी एकाला अटक करण्यात आली. जेणेकरून लोकांना या लाजिरवाण्या कृत्याचा विसर पडणार असेल. त्यांचा विवेक मेला आहे. निर्लज्जपणा जिंदाबाद’, अशा खोचक शब्दांमध्ये त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
तसेच बिग बॉस फेम अली गोणीने या घटनेवर सडेतोड टीका करत ट्विट केले आहे, ‘ज्या देशात महिलांना सर्वांत मोठा दर्जा दिला जातो, त्याच देशात हे सर्व घडत आहे. अंत जवळ आला आहे.’ लेखक वरुण ग्रोवरनेही याप्रकरणी ट्विट करत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ‘त्यांच्या राजवटीत जमाव हिंसा शिगेला पोहोचली आहे, याची त्यांना अजून देखील लाज वाटत नाही. इंटरनेट बंद असताना देखील त्यांना पाठिंबा देणाऱ्या जमावाच्या गैरकृत्यांचा व्हिडीओ समोर आला आहे. आता त्यांच्यावर खोटी कारवाई करावी लागणार, याचा त्यांना राग आहे’, अशा शब्दांत त्याने सरकारला धारेवर धरले आहे.
तसेच या प्रकरणावर मराठी अभिनेत्री हेमांगी कवीने देखील प्रतिक्रिया दिली आहे. “मणिपुर घटना!!! कधी थांबणार हे आणि कसं? सुन्न व्हायला होतं! हे घाणेरडं कृत्य करणारी २-३ माणसं असतील पण ते बघणारा अख्खा एक समुह असतो! त्या दोघा तिघांना अडवणारं त्यातलं कुणीच नसतं? बाप रे! इथं सोशल मीडियावर त्याबद्दल बोलून काही उपयोग नाही वगैरे अगदी बरोबर आहे पण जशी ती क्लिप आणि बातमी पसरतेय तसंच थोडंसं शहाणपण आणि माणूसपण पसरलं तर?” असं हेमांगीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…
मणिपूर हिंसाचाराची स्वत:हून दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला फटकारले आहे. दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात येत असल्याचा व्हिडीओ अस्वस्थ करणारा आहे. केंद्र आणि राज्य सरकारने ठोस कारवाई करावी, अन्यथा न्यायालय हस्तक्षेप करणार असल्याचे यावेळी न्यायालयाने सांगितले आहे.