Box Office: ‘थंगालन’ने पहिल्याच दिवशी केली दमदार कमाई, चित्रपटाचं एकूण कलेक्शन किती? जाणून घ्या

Box Office: ‘थंगालन’ने पहिल्याच दिवशी केली दमदार कमाई, चित्रपटाचं एकूण कलेक्शन किती? जाणून घ्या

Thangalaan Box Office Collection Day 1: 15 ऑगस्टच्या निमित्ताने, दक्षिण स्टार छियान विक्रमने (Chhiyan Vikram) बॉलीवूड (Bollywood) चित्रपटांना जोरदार स्पर्धा दिली आहे. बॉलीवूडमध्ये स्त्री 2 (Stree 2), खेल खेल में (Khel Khel Mein) आणि ‘वेदा’ हे (Vedaa) तीन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले, तर विक्रमचा ‘थंगालन’ (Thangalaan Movie) हा दक्षिणेत प्रदर्शित झाला. या मोठ्या चित्रपटाने अक्षय आणि जॉनच्या ‘खेल खेल में’ आणि ‘वेदा’ या दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मागे सोडले आहे. एकट्या थंगालनने या दोन चित्रपटांपेक्षा जास्त गल्ला कमावला आहे. थंगालनचा पहिल्या दिवसाचा गल्ला किती कमावला आहे, चला तर मग जाणून घेऊया…

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikram (@the_real_chiyaan)


चियान विक्रमच्या थंगालनबद्दल बोलायचे झाले तर त्याबद्दल आधीच बरीच चर्चा होती. हा कॉलिवुडमधील सर्वात मोठा चित्रपट मानला जात होता. प्रमोशनच्या माध्यमातून विक्रमने चित्रपटासाठी चांगली बाजारपेठही तयार केली होती. त्यामुळे आगाऊ बुकिंगमध्येच चित्रपटाने चांगली कमाई केली होती.

पहिल्याच दिवशीचा गल्ला किती?

सकनिल्कच्या रिपोर्टनुसार, विक्रमच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी 12.6 कोटींचा गल्ला जमवला आहे. ज्यामध्ये तामिळमध्ये 11 कोटी रुपये, तेलुगूमध्ये 1.5 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 0.1 कोटी रुपये कलेक्शन आहे. आठवड्याच्या शेवटी या कलेक्शनमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. पहिल्याच दिवशी 13-14 कोटी रुपयांची कमाई होईल, अशी अपेक्षा होती.

Thangalaan OTT: आता ओटीटीवर दिसणार ‘थंगालन’चा थरार; कधी अन् कुठे पाहता येईल चित्रपट?

अक्षय-जॉनला मागे सोडले

15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत थंगलनने दुसरे स्थान पटकावले आहे. स्ट्री 2 ने प्रथम क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले आहे. तर अक्षयच्या ‘खेल’ने 5 कोटी आणि जॉनच्या वेदाने 6.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या दोघांचे कलेक्शन एकत्र करून थंगलनची कमाईही जास्त आहे.

‘थंगालन’बद्दल बोलायचे झाले तर चियान व्यतिरिक्त या चित्रपटात मालविका मोहनन, पशुपती, पार्वती, थिरुवोथू आदी कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट कोलार गोल्ड फील्ड (कर्नाटक) मधील खाण कामगारांच्या जीवनावर आधारित आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube