Video : पती आला, सिंदूर पुसलं आणि नंतर…’त्या’ अवस्थेत कारमध्ये बॉयफ्रेंडसोबत रंगेहात पकडलं

Video : पती आला, सिंदूर पुसलं आणि नंतर…’त्या’ अवस्थेत कारमध्ये बॉयफ्रेंडसोबत रंगेहात पकडलं

Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एका पतीला आपल्या पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत अफेअर असल्याचं समजतं. तो तिला प्रियकरासोबत रंगेहात पकडतो. (Video) त्यानंतर तो आपल्या पत्नीच्या कपाळावरील सिंदूर पुसून टाकतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून, अनेक नेटकऱ्यांनी यावर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक लाल रंगाची चारचाकी गाडी दिसत आहे. या गाडीमध्ये एक विवाहित जोडपे बसलेले दिसत आहे. ड्रायव्हिंग सीटवर एक तरुण आहे, तर त्याच्याशेजारी एक महिला बसलेली दिसते. तेवढ्यात एक व्यक्ती गाडीजवळ येतो आणि त्या महिलेला गाडीतून बाहेर काढते. तिला एका बाजूला घेऊन जाते. व्हिडीओत त्या महिलेचा कथित प्रियकरही तेथे उभा असल्याचे दिसत आहे.

ग्राम चिकित्सालय अभिनेत्री आकांक्षा रंजन कपूरने शेअर केली अरुणाभ कुमारसोबत BTS फोटो अन्

त्यानंतर, त्या महिलेचा पती एका भांड्यात पाणी घेऊन तिच्याजवळ जातो. तेव्हा ती महिला त्याचा हात पकडते. पुढे, या पुरुषाने त्या महिलेच्या कपाळावरील सिंदूर पाण्याने फुसले आहे. त्यानंतर तो तेच सिंदूर तिच्या कथित प्रियकराला देतो आणि तो प्रियकर ते सिंदूर महिलेच्या कपाळावर लावतो. दरम्यान ती महिला लाजून इकडे-तिकडे पाहते आणि आपले तोंड लपवण्याचा प्रयत्न करते.

असं बोललं जात आहे की, त्या महिलेला तिच्या प्रियकरासोबत जाताना तिच्या पतीने रंगेहाथ पकडलं. मात्र, तिला पकडणारी व्यक्ती खरंच तिचा पती आहे की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अनेकदा प्रसिद्धीसाठी किंवा व्ह्यूज मिळवण्यासाठी असे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. यामुळे संबंधित व्यक्तींना फायदा होतो. मात्र, या व्हिडीओच्या सत्यतेबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube