Dara Singh Death Anniversary: ‘बजरंग बलीच्या एका भूमिकेनं दारा सिंह यांचं बदल आयुष्य!
Dara Singh Death Anniversary: कुस्तीपटू, अभिनेते, दिग्दर्शक तसेच राजकारणी दारासिंग (Dara Singh) यांची आज 11 वी पुण्यतिथी आहे. ते देशाचे पहिले आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू (International wrestler) म्हणून त्यांची ओळख होती. अभिनेते दारा सिंह यांचे नाव घेताच चाहत्यांचे लगेचच हात जोडले जात असतात. ‘रामायण’ (Ramayana) सिरीयलमध्ये त्यांनी साकारलेली भगवान बजरंग बलीमुळे (Bajrangbali ) मनोरंजन क्षेत्रात देखील त्यांची ओळख बजरंग बली म्हणूनच बनली होती.
दारासिंग यांची उंची ६ फूट २ इंच, वजन १३० किलो आणि ५४ इंच रुंद छाती… असा त्यांचा रुबाबदार व्यक्तिमत्त्व असणाऱ्या दारा सिंह यांना बघणारा व्यक्ती अगदी भाराहून जात असतं. ते कुस्तीच्या आखाड्यामध्ये शिरताच समोरचा पैलवान हा गारचं होत असायचा. कुस्तीच्या मैदानातील पराक्रमासाठी दारा सिंह यांना ‘रुस्तुम-ए-हिंद’ ही पदवी देखील देण्यात आली आहे. कुस्तीचा मैदानचं नव्हे तर सिनेमाचा पडदा देखील गाजवला आहे. परंतु दारा सिंह यांनी १२ जुलै २०१२ या दिवशी जगाचा अखेर निरोप घेतला आहे.
कुस्तीच्या मैदानापासून त्यांनी अभिनयाचा प्रवास सुरू केला होता. दुनियेत पोहोचलेले दारा सिंह प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर यश संपादन करत राहिले आहेत. त्यांनी कुस्ती आणि अभिनय या दोन्ही गोष्टी एकाचवेळी सांभाळली आहे. तसेच दोन्हीमध्ये ते कायम यशस्वी झाल्याचे देखील दिसून आले आहे. अभिनय करत असताना ना ते स्वत:ला कधीच कुस्तीपटू मानत नसत, ना कुस्ती खेळत असताना स्वत:ला कधी स्टार देखील समजत नसतं. त्यांची प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून करत असल्याने नेहमीच त्यांना यश मिळाले आहे.
आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?
बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळवून देखील त्यांनी कधी डोक्यामध्ये दुसऱ्या गोष्टींविषयी हवा जाऊ दिली नाही. केवळ क्रीडा आणि मनोरंजनच नाही तर, त्यांना राजकारणातही चांगले स्थान मिळाले होते. दारा सिंह यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९२८ रोजी पंजाबमधील अमृतसर येथे एका जाट कुटुंबात झाला होता. वयाच्या २०व्या वर्षी ते सिंगापूरला गेले होते. तेथे जाऊन त्यांनी अक्षरशः ड्रम बनवण्याच्या फॅक्टरीमध्ये काम करू लागले होते. परंतु त्यांच्यात कुस्तीपटू बनण्याची इच्छा आहे. हे त्यांच्या सुपरवायझरने चांगलंच ओळखले होते. त्यांच्या सांगण्यावरून दारा सिंह यांनी कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती.
१९४९मध्ये त्यांनी क्वालालंपूरमध्ये तत्कालीन प्रसिद्ध कुस्तीपटू तरलोक सिंहचा पराभव केला आणि मलेशिया चॅम्पियनचा किताब त्यांनी मिळवला होता. तसेच त्यांनी १९५२ साली ‘संगदिल’ सिनेमाने दारा सिंह यांनी बॉलिवूडमध्ये देखील एन्ट्री मारली होती.नंतर काही वर्षे ते सिनेमामध्ये छोट्या भूमिका करत राहिले. तसेच १९६२मध्ये त्यांना ‘किंग काँग’ या सिनेमात मुख्य अभिनेता म्हणून घेण्यात आले होते. कुस्तीवर आधारित या सिनेमाची जगभरात चांगलीच चर्चा झाल्याचे मिळाले होते.