Daring Partners मध्ये तमन्ना भाटिया अन् डायना पेंटी स्क्रीन शेअर करणार

Daring Partners मध्ये तमन्ना भाटिया अन् डायना पेंटी स्क्रीन शेअर करणार

Daring Partners : ‘डेअरिंग पार्टनर्स’ ( Daring Partners ) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कायम फॅशन आणि तिच्या नवनवीन प्रोजेक्ट्स मधून चर्चेत असणारी अभिनेत्री पॅन इंडिया स्टार तमन्ना भाटिया आणि डायना पेंटी या दोघी या चित्रपटात एकमेकींसोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. नुकतच या आगामी प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली आहे.

वंचित बहुजन पक्षाचे नवे चिन्ह काय असणार? आंबेडकरांनी EC कडे केली ‘या’ चिन्हांची मागणी

‘डेअरिंग पार्टनर्स’ ही दोन जिवलग मित्रांची कथा आहे जे अल्कोहोल स्टार्ट-अपचे भागीदार म्हणून एक धाडसी प्रवास सुरू करतात. याची कथा खूप सुंदर लिहीली आहे. या प्रकल्पाबद्दल आता सगळ्यांना उत्सुकता आहे आणि ती यात काय भूमिका साकारणार हे बघण उत्कंठावर्धक असणार आहे. अर्चित कुमार आणि निशांत नाईक दिग्दर्शित ‘डेअरिंग पार्टनर्स’मध्ये जावेद जाफरी यांचीही भूमिका आहे.

Loksabha Election : शरद पवारांचं सरप्राईज; माढ्याची जागा महादेव जानकरांनाच…

चित्रपटाचे लेखन नंदिनी गुप्ता, मिथुन गंगोपाध्याय आणि आर्ष व्होरा यांनी केले आहे. ‘डेअरिंग पार्टनर्स’च्या पलीकडे तमन्ना यावर्षी अनेक मनोरंजक प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. अभिनेत्रीकडे तेलगूमध्ये ‘ओडेला 2’, हिंदीमध्ये वेदा आणि तमिळमध्ये ‘अरनमानाई 4’ मध्ये ती दिसणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या