Jawan 2: शाहरुख खानच्या ‘जवान’चा दुसरा भाग बनणार? ऍटलीने थेटच सांगितलं, म्हणाला…

Jawan 2: शाहरुख खानच्या ‘जवान’चा दुसरा भाग बनणार? ऍटलीने थेटच सांगितलं, म्हणाला…

Director Atlee Hint Jawan 2 Movie: गेल्या वर्षी बॉलिवूडचा (Bollywood) बादशाह म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक ॲटली (Director Atlee) यांनी पहिल्यांदा एकत्र काम केले. दोघांनी ‘जवान’ (Jawan Movie) नावाचा चित्रपट आणला. त्या चित्रपटात एकीकडे ॲटलीचं दिग्दर्शन अप्रतिम होतं, तर दुसरीकडे शाहरुख खान (Shah Rukh Khan) खूप ॲक्शन करताना दिसला. हा चित्रपट लोकांना इतका आवडला की तो बॉक्स ऑफिसवर (box office) प्रचंड हिट ठरला. आता जवानचा दुसरा भाग बनला तर शाहरुखच्या चाहत्यांना तो नक्कीच बघायचा असेल. नुकतेच ॲटलीनं याबाबत चर्चा केली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना ॲटली यांना ‘जवान 2’बद्दल विचारण्यात आले. यावर तो थेटच म्हणाला की, “मला अद्याप याबाबत खात्री नाही. पण, मी काहीतरी लिहणार आहे. जे तुम्हाला बघून आश्चर्यचकित करणार आहे. प्रत्येक चित्रपटाचा सिक्वेल येण्याची संधी असते, पण मी नेहमीच वेगवेगळ्या आशयाने प्रेक्षकांना चकित करत असतो. म्हणून मी काहीतरी नक्कीच नवीन घेऊन येणार आहे.

शाहरुखसोबत पुन्हा काम करण्याबद्दल काय म्हणाला?

शाहरुखसोबत पुन्हा काम करणार का असे त्यांना विचारण्यात आले, त्यावेळेस ते म्हणाले की, “नक्कीच, यात काहीही नकार नाही. आम्ही एकत्र काम करू. केव्हा, कसे, हे सर्व शाहरुख सरांवर आहे. शाहरुखसोबत काम करताना कसं वाटलं, याबद्दलही ॲटलीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाला की, “हे अद्भुत होते. तो खूप विनोदी व्यक्ती आहे. तो त्याच्या कामाशी भावनिकरित्या जोडलेला असतो. त्याला दृष्टी आहे. तो खूप वक्तशीर आहे. कोणताही चित्रपट कसा बनवावा यावर त्यांचा भर असतो आणि ते म्हणजे चित्रपटाचे बायबल.

Daring Partners मध्ये तमन्ना भाटिया अन् डायना पेंटी स्क्रीन शेअर करणार

शाहरुखच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट

मात्र, कमाईच्या बाबतीत ‘जवान’ हा शाहरुख खानच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे बजेट अंदाजे 300 कोटी रुपये होते आणि या चित्रपटाने जगभरात 1150 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube