Rajesh Khanna यांच्या घरात पाऊल ठेवताच कळालं, पण… डिम्पल यांनी व्यक्त केली खंत
Dimple Kpadia On Marrige with Rajesh Khanna : ‘बॉबी’ चित्रपटातून वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी रातोरात स्टार बनलेली अभिनेत्री डिंपल कपाडिया. राज कपूर यांनी 1970 मध्ये ‘मेरा नाम जोकर’ हा चित्रपट बनवला होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. पण यात डिंपल कपाडिया त्यांना तारणारी ठरली. डिंपल कपाडियांच्या ‘बॉबी’ने सुपरहीट ठरत राज कपूर यांचं कर्ज फिटलं. डिंपल कपाडियाला या चित्रपटाने आपली ओळख मिळाली.
मात्र त्यानंतर लगेचच तिने राजेश खन्नाशी लग्न केलं. अगदी कमी वयात आणि आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या या सुपरस्टारशी केललं डिंपल यांचं लग्न काही वर्षातच मोडलं देखील मात्र या लग्नाविषयी त्यांनी एका मुलाखतीमध्ये एक खंत ही व्यक्त करून दाखवली होती. त्या म्हणाल्या की, सुन म्हणून राजेश खन्नांच्या घरात पाऊल ठेवताच मला कळालं होतं की, हे लग्र एक चुक आहे. हे लग्न टिकणार नाही.
डिंपल कपाडिया असं का म्हणाल्या?
डिंपल कपाडियांना मिळालेल्या स्टारडमसाठी इंडस्ट्रीतीन सगळेच लोक तरसतात. मात्र डिंपल यांना माहित नव्हत की, आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या या सुपरस्टारशी केललं डिंपल यांचं लग्न त्यांच्यापासून त्यांच स्टारडम हिरावून घेणार आहे. कारण लग्नानंतर तब्ब्ल 11 वर्ष त्यांनी चित्रपटांतून ब्रेक घेतला. दरम्यान त्यांना दोन मुली झाल्या आणि वैवाहिक आयुष्यातही अडचणी सुरू झाल्या.
Pune Politics : काँग्रेसला पुण्याच्या बदल्यात दुसऱ्या जागेची राष्ट्रवादीकडून ऑफर!
दरम्यान 1984 मध्ये डिंपलने सागर या चित्रपटातून कमबॅक केले. या दरम्यान डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना या दाम्पत्याने आपल्या वैवाहिक जीवनावर एक मुलाखत दिली. यावेळी एक खंत ही व्यक्त करून दाखवली होती. त्या म्हणाल्या की, सुन म्हणून राजेश खन्नांच्या घरात पाऊल ठेवताच मला कळालं होतं की, हे लग्र एक चुक आहे. हे लग्न टिकणार नाही.
कारण असं देखील सांगितलं जात की, लग्न होताच राजेश खन्ना यांनी डिंपलच्या चित्रपटांमध्ये काम करण्यावर बंदी आणली. त्या काळी त्यांना एक चित्रपटासाठी 5 लाख रूपये मिळायचे. मी माझ्या करिअरमध्ये बॉबीच महत्त्व समजू शकले नाही. मी लहान होते. त्यानंतर लगेचच 1982 मध्ये डिंपलने राजेश खन्नांच्या जीवनातून बाहेर पडल्या. 2012 मध्ये राजेश खन्ना यांचं निधन झालं.