Director Madhur Bhandarkar : ‘सर्किट’ सिनेमाबद्दल दिग्दर्शक मधुर भंडारकरांनी केला ‘हा’ मोठा खुलासा
Madhur Bhandarkar and Milind Shinde : बॉलिवूडमधील दिग्गज चित्रपट निर्माते मधुर भंडारकर (Madhur Bhandarkar) यांनी दिलेल्या लेट्सअप च्या मुलाखतीत ‘सर्किट’ (Circuit) या सिनेमाविषयी मोठा खुलासा (New Film) त्यांनी केला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत नाव मिळवणारा मराठी दिग्दर्शक ही मधुर भांडारकर (Director Producer Madhur Bhandarkar) यांची ओळख आहे. ‘पेज थ्री’, ‘फॅशन’, ‘जेल’, ‘हिरॉइन’सारखे वेगळ्या विषयांवरचे चित्रपट देणाऱ्या या राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या दिग्दर्शकाने मराठी चित्रपट केला आहे तर नक्कीच त्याचे स्वागत होईल.
मात्र, सध्या तरी मधुर हिंदीत इतके रमले आहेत की मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन ही अजून लोकांसाठी स्वप्नवत गोष्ट आहे. पण, दुधाची तहान ताकावर.. म्हणतात ना तसेच मधुर भांडारकर यांनी पूर्ण मराठी चित्रपट नाही, पण मराठी चित्रपटाचे पहिले आणि एकच दृश्य दिग्दर्शित करून आपली तहान भागवली आहे.
View this post on Instagram
मधुर भांडारकर यांच्या ‘सर्किट’ चित्रपटासाठी साहाय्यक दिग्दर्शन करणारे आकाश पेंढारकर हे चित्रपटाद्वारे मराठीत स्वतंत्रपणे दिग्दर्शक म्हणून सुरुवात करत आहेत. मराठी चित्रपटांवर माझे प्रेम आहेच. पण आज ज्या वेगाने मराठी चित्रपट पुढे जात आहेत त्याचे खरोखर कौतुक करायला हवे’, अशा शब्दांत भांडारकर यांनी मराठी चित्रपटकर्मीना दाद दिली आहे.
View this post on Instagram
मधुर भांडारकर यांचे सर्किटचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात मिलींद शिंदे मुख्य हे भूमिकेत आहे. तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे (Milind Shinde) यांनी अनेक भूमिकांमधून आपल्या कसदार अभिनयाचे दर्शन घडवले आहे. पण ७ एप्रिलला प्रदर्शित झालेला सर्किट हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतला अनोखा चित्रपट ठरला आहे.
View this post on Instagram
कारण या चित्रपटातील त्यांच्या खलनायकी भूमिकेसाठी त्यांच्या वाट्याला एकही संवाद नसून, केवळ शारीरिक हालचाली आणि चेहऱ्यावरील हावभावांच्या जोरावर त्यांनी या भूमिकेत अभिनयाचे रंग भरले आहे. या खलनायकी भूमिकेच्या वाट्याला स्वाभाविकपणे खटकेबाज संवाद येतात, शिवाय अभिनयाचीही संधी असतेच.
‘सर्किट’ या चित्रपटातील खलनायकी भूमिकेला एकही संवाद नाही. केवळ डोळे आणि चेहऱ्यावरील हावभावातून ही भूमिका साकारणं अत्यंत आव्हानात्मक होतं. पण मिलिंद शिंदे यांनी हे आव्हान पेलत खलनायकी भूमिकेचा नवा मानदंडच त्यांनी प्रस्थापित केला आहे. भांडारकर एंटरटेन्मेंट आणि पराग मेहता प्रस्तुत “सर्किट” या चित्रपटाची निर्मिती मधुर भांडारकर, फिनिक्स प्रॉडक्शनच्या पराग मेहता, अमित डोगरा आणि देवी सातेरी प्रॉडक्शनच्या प्रभाकर परब यांनी केली आहे.
Akshay Kumar : 55 वर्षीय खिलाडीला शर्टलेस होऊन डान्स करणं पडलं महागात; व्हिडीओ पाहून चाहते भडकले
तसेच स्वरूप स्टुडिओचे सचिन नारकर, विकास पवार तर फिनिक्स प्रॉडक्शनचे अल्पेश गेहलोत, कीर्ति पेंढारकर, आकाश त्रिवेदी, मनोज जैन, मोहित लालवाणी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. आकाश पेंढारकर यांनी या चित्रपटातून आपले दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. आनंद पेंढारकर, जितेंद्र जोशी यांनी गीतलेखन, तर अभिजीत कवठाळकर यांचं श्रवणीय संगीत या चित्रपटाला लाभलं आहे.
संजय जमखंडी यांनी रुपांतरित कथा आणि संवाद लेखन, शब्बीर नाईक यांनी छायांकन, तर अतुल साळवे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून जबाबदारी निभावलीय. चित्रपटात वैभव तत्त्ववादी, हृता दुर्गुळे, रमेश परदेशी, मिलिंद शिंदे अशी तगडी टीम यामध्ये काम केली आहे.