तुम्हाला माहिती आहे का? गौतमीला कोणता खेळाडू आवडतो? पहा ती काय म्हणाली…

Untitled Design   2023 04 04T113113.507

मुंबई : सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेले एक लोकप्रिय नाव म्हणजे गौतमी पाटील (Gautami Patil) हे होय. तिच्या अदाकारी व तिचे नृत्यू यामुळे संपूर्ण राज्यात तिची प्रचंड क्रेझ पहायला मिळते. तिचे शो पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात. तिचा चाहता वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र गौतमीला देखील एक व्यक्ती आहे जो खूप आवडतो. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार म्हणजेच कॅप्टनकुल महेंद्रसिंग धोनी हा आवडतो. याबाबत तिने स्वतः खुलासा केला आहे.

देशात सध्या सर्वाधिक लोकप्रिय असलेला क्रिकेट स्पर्धेतील प्रकार टी 20 लीग स्पर्धा सुरु आहे. प्रचंड लोकप्रिय असलेल्या या खेळाचे करोडो चाहते आहे. या स्पर्धेतील संघ जेवढे लोकप्रिय आहे तेवढेच संघातील काही खेळाडू देखील प्रसिद्ध आहे. यातच या खेळातील आवडत्या खेळाडू बाबत नृत्यांगना गौतमी पाटील हिला विचारण्यात आले. यावेळी गौतमीने देखील आपल्या आवडत्या खेळाडूचे (faviorite cricketer) नावाबाबत माहिती दिली.

गौतमीचा आवडता संघ व खेळाडू
गौतमी पाटीलला टी 20 लीग स्पर्धेमधील संघांमध्ये मुंबईचा संघ हा तिचा फेव्हरेट संघ आहे. तर खेळाडू बाबत बोलताना गौतमी म्हणाली, कॅप्टन कुल अशी ओळख असलेला व भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा माझा आवडता खेळाडू आहे.

ट्विटरच्या लोगोत बदल, चिमणी उडाली भुर्रर…आता ‘डॉगी’ दिसू लागला

गौतमीची भन्नाट क्रेझ
आजकाल राजकीय कार्यक्रम असो, उद्घाटन असो किंवा बर्थ डे…गौतमीच्या शोचे आयोजन केले जाते. तिचा शो आयोजन करणं म्हणजे तिच्यासोबत स्वतः देखील चर्चेत येणे असे समीकरण सध्या बनले आहे. यामुळे तिचा शो ज्याठिकाणी आयोजित करण्यात आला असतो त्याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी आजवर पाहायला मिळाली आहे.

धाराशिवमध्ये राष्ट्रवादीला मोठे खिंडार, डझनभर नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेत दाखल

एका कार्यक्रमाचे दोन-अडीच लाख मानधन घेणाऱ्या गौतमीची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता तर महिला देखील गौतमी पाटीचा कार्यक्रमत आयोजित करत आहेत. महिला दिनानिमित्तानं पुण्यात गौतमीचा सत्कार देखील करण्यात आला.

Tags

follow us