Box Office: ‘ड्रीम गर्ल २’चा बॉक्स ऑफिसवर जलवा! पहिल्या दोन दिवसांपेक्षा चौथ्या दिवशी तुफान कमाई

Box Office: ‘ड्रीम गर्ल २’चा बॉक्स ऑफिसवर जलवा! पहिल्या दोन दिवसांपेक्षा चौथ्या दिवशी तुफान कमाई

Box Office: आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडेच्या मुख्य भूमिका असलेला ‘ड्रीम गर्ल २’ (Dream Girl 2) २५ ऑगस्ट दिवशी प्रदर्शित करण्यात आला. (Box Office) सिनेमाने अवघ्या ३ दिवसाम्काध्ये ४० कोटींचा गल्ला कमावला आहे. यानंतर चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी हा सिनेमा किती कमाई करतोय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. तर, सिनेमाच्या चौथ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Music Company (@zeemusiccompany)


‘ड्रीम गर्ल २’ ने पहिल्या दिवशी १०.६९ कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सिनेमाने १४.०२ कोटींची कमाई केली आहे. आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सिनेमाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ बघायला मिळाली आहे. रविवारी सिनेमाने तब्बल १६ कोटींचा गल्ला कमावला आहे. आता चौथ्या दिवसाचे प्रारंभिक आकडे देखील समोर आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार ‘ड्रीम गर्ल २’ ने प्रदर्शितच्या चौथ्या दिवशी म्हणजेच पहिल्या सोमवारी अंदाजे ४.७० कोटींची दमदार कमाई केली आहे. तसेच ‘ड्रीम गर्ल २’ची ४ दिवसांची एकूण कमाई आता ४५.४१ कोटींवर गेल्याचे बघायला मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर अगोदरच राज्य करणाऱ्या ‘गदर २’ आणि ‘OMG 2’ ला टक्कर देत ‘ड्रीम गर्ल २’ देखील यशस्वी घोडदौड ठरला आहे . इतकंच नाही तर कमी बजेट असलेला हा सिनेमा देखील बॉक्सवर जबरदस्त कलेक्शन करत असल्याचे बघायला मिळत आहे.

Jailer: थलायवाच्या ‘जेलर’मधील ‘तो’ सीन हटवण्याचा न्यायालयाकडून आदेश

हा सिनेमा आज ५० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच रक्षाबंधनाच्या सुट्टीचा देखील या आठवड्यात सिनेमाला फायदा होऊ शकणार आहे. यामुळे त्याच्या कलेक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या सिनेमात आयुष्मान खुराना, अनन्या पांडे यांच्यासह अन्नू कपूर, मनजोत सिंग, अभिषेक बॅनर्जी, विजय राज, परेश रावल, राजपाल यादव, मनोज जोशी यांच्या भूमिका आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube