Dream Girl 2 मध्ये लवकरच उलगडणार भाईजानच्या अविवाहित असण्याचं कारण? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 21T122514.539

Dream Girl 2: हिंदी सिनेमासृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana) याचा चाहता वर्ग खूप आहे. आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) या सिनेमानी चाहते खूप उत्सुकतेने वाट बघत आहेत. ड्रीम गर्ल सिनेमाने चाहत्यांची मोठी पसंती मिळाली होती. आता या सिनेमाचा दुसरा भाग चाहत्यांच्या पुन्हा भेटीस येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)


नुकताच ‘ड्रीम गर्ल 2’ या सिनेमाचा एक खास व्हिडीओ आयुष्मान खुराना यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Video Viral) या व्हिडीओत ‘किसी का भाई किसी का जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमामधील अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) आवाज ऐकू येत असलयाचे दिसून येत आहे. आयुष्मान खुरानाने ‘ड्रीम गर्ल 2’ यी सिनेमाचा एक खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या व्हिडीओत भाईजान हा ‘ड्रीम गर्ल 2’ मधील पूजासोबत फोनवर गप्पा मारत असल्याचे दिसत आहे. पूजाला भाईजान म्हणतो, ‘पूजा तुझ्यामुळे मी लग्न केलं नाही. या व्हिडीओत पूजा ही रेड साडी, हातात गुलाब आणि गळ्यात माळ, अशा जबरदस्त लूकमध्ये दिसून आली आहे. ‘ड्रीम गर्ल 2’ मध्ये पूजा ही भूमिका अभिनेता आयुष्मान यांनी साकारली आहे.

विजयानंतर दामलेंचं रंगकर्मी नाटक समूह पॅनल शरद पवारांच्या भेटीला!

‘ड्रीम गर्ल- 2’ हा सिनेमा 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ड्रीम गर्ल या सिनेमाचा सिक्वेल आहे. या सिनेमामधील आयुष्मानच्या अभिनयाला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली होती. ‘ड्रीम गर्ल- 2’ मध्ये आयुष्मानबरोबर अनन्या पांडे, परेश रावल, राजपाल यादव, असरानी, ​​विजय राज, अन्नू कपूर, सीमा पाहवा, मनोज जोशी, अभिषेक बनर्जी आणि मनजोत सिंह हे प्रमुख भूमिका साकारली असल्याचे सांगितले जात आहे ‘ड्रीम गर्ल- 2’ या सिनेमाची आणखी रिलीज डेट जाहीर करण्यात आली नाही. परंतु या सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्कटता लागली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube