Eka Kale Che Mani: विनोदी मराठी वेब सिरीज ‘एका काळेचे मणी’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज!

Eka Kale Che Mani: विनोदी मराठी वेब सिरीज ‘एका काळेचे मणी’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज!

प्रेरणा जंगम

Eka Kale Che Mani: जिओ सिनेमावर (Jio Cinema) प्रथम हलकी फुलकी पारिवारीक कॉमेडी सिरीज प्रसारीत होत आहे. २६ जून रोजी एका काळेचे मणी (Eka Kale Che Mani) या मालिकेचा प्रिमियर प्रसारीत करण्यात येणार आहे. प्रसिध्द मराठी कलाकार प्रशांत दामले हे या मालिकेतील प्रमुख भुमिकेत असणार आहेत. या मालिकेच्या माध्यमातून ते सिरीज क्षेत्रात पदार्पण करत आहेत. एका काळेचे मणी या सीरियलमध्ये पिढ्यांमधील संघर्षाबरोबरच परंपरागत मध्यमवर्गीय मुल्यांचा अंगिकार करणारे पालक, मुलांची जीवनशैली आणि त्यांचे अपरंपरागत मार्ग चोखाळणे यांच्यातील संघर्ष अधोरेखित करण्यात आला आहे.

अतूल केळकर यांनी दिग्दर्शित करण्यात आलेल्या या सिरीजची निर्मिती ही महेश मांजरेकर, ऋतुराज शिंदे आणि ऋषी मनोहर यांनी केली आहे. यामध्ये पौर्णिमा मनोहर, ऋता दुर्गुळे, समीर चौघले आणि विशाखा सुभेदार महत्त्वपूर्ण भुमिकेत आपल्याला दिसणार आहेत. जिओ स्टुडिओजद्वारा प्रदर्शित या सिरीज मध्यमवर्गीय मुल्यांचा पुरस्कार करणार्‍या मराठी कुटुंबावर आधारीत कथा आहे. तसेच मुलांबरोबरच्या मतभेदांना ते अगदी विनोदी पध्दतीने कशा प्रकारे हसतमुखाने सामोरे जातात हे दर्शवण्यात आले आहे.

एक कुटूंबप्रमुख म्हणून वडिलांना परिवाराच्या छबीची चिंता आहे, तर आईला मोठ्या मुलाच्या लग्नाची चिंता आहे. दुसरीकडे त्यांची मुलगी एक प्राणीप्रेमी आहे, पाळीव प्राण्यांसाठी कपड्यांचा ब्रॅन्ड तयार करण्याचे तिचे स्वप्न आहे. मुलगा आयर्लंडमध्ये पीएचडीचे शिक्षण घेतो आणि पीएचडी नंतर पुन्हा भारतात येण्याचा त्याचा मानस आहे. लग्न जुळवण्याच्या खटपटीत कुटूंबाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर विनोद निर्मिती होते.

यावर प्रशांत दामले म्हणतात की “एका इरसाल कुटूंबातील एका साधारण बापाची भुमिका करणे म्हणजे एक पर्वणी असते. मला आनंद होत आहे की, मी एका काळेचे मणी या सिरीजच्या माध्यमातून मी ओटीटीवर पदार्पण करत आहे. यामध्ये एक अस्सल कौटुंबिक कथा आहे, जी प्रत्येक कुटूंबाबरोबर जोडली जाऊ शकेल. अतिशय चांगल्या कलाकारांबरोबर काम करणे एक आनंददायी अनुभव राहिला आहे. त्यामुळे लोकांच्या जीवनात हास्य पुन्हा निर्माण होऊ शकेल.

Raja Karale Passes Away : ‘भैरू पैलवान की जय’ फेम दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचं निधन

एका काळेचे मण हा एक पारिवारीक नाट्यमय अशी मालिका असून यामध्ये एकत्र राहण्याची मुल्ये दर्शवतात. हा एक हलकाफुलका चित्रपट आहे. ज्याचा सर्वजण आनंद घेऊ शकतात. कथानक, पात्रे आणि काम हे प्रेक्षकांना आनंद देऊन त्यांचे मनोरंजन करण्यास योग्य आहे. प्रशांत दामले हे श्री काळेंच्या भुमिकेत असल्याने एक ताजातवाना करणारा अनुभव ठरले आहेत. त्यांची आभा ही त्यांच्या कामातून दिसून येते. एकंदरीत एका काळेचे मणी म्हणजे मनोरंजनाचा एक अनोखा गुच्छ आहे जो कोणीच टाळू नये.” असे निर्माता महेश मांजरेकर यांनी सांगितले आहे.

विनोद आणि पारिवारीक नाट्याने युक्त अशा एका काळेचे मणीकडून हास्य, भावना आणि संबंधित क्षणांची रोलरकोस्टर राईड प्राप्त करुन दिली जाते. प्रेक्षकांना आता नवीन पात्रे, चांगले कथानक आणि परंपरागत मुल्यांचा संगम साधून तरुण पिढीच्या आकांक्षांना सादर करण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube