Shashank Ketkar: इमरान हाश्मीच्या नव्या वेब सीरिजमध्ये झळकणार शशांक केतकर, भन्नाट कथा अन्…

Shashank Ketkar: इमरान हाश्मीच्या नव्या वेब सीरिजमध्ये झळकणार शशांक केतकर, भन्नाट कथा अन्…

Shashank Ketkar: अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) हा कायम वेगवेगळ्या गोष्टी मधून जोरदार चर्चेत असतो. मालिका, वेब शो आणि चित्रपटात तो आजवर आपल्याला दिसला आहे. शशांक लवकरच “शो टाईम” (Showtime) या नव्या कोऱ्या वेब सीरिजमध्ये (web series ) एका बड्या कलाकारांसोबत झळकणार आहे. अभिनेता इमरान हाश्मीसोबत (Emraan Hashmi) तो स्क्रीन शेयर करणार असून आजपासून हॉटस्टारवर (Hotstar) हा वेब शो येणार आहे.

बॉलीवूड विश्व आणि त्याची अनोखी दुनिया यातून बघायला मिळणार असून शशांक यात काय भूमिका साकारणार आहे हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. शशांकने या आधी सुद्धा हिंदी वेब सीरिजमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली होती. आता पुन्हा एकदा तो प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी सज्ज होत आहे. शशांकची भूमिका ही नक्कीच वेगळी असणार यात शंका नाही. शो टाईममध्ये अनेक बॉलीवूड कलाकारांची वर्दी असून शशांक केतकर या मोठ्या कलाकारांसोबत झळकणार आहे.

Manjummel Boys: ‘या’ साऊथ चित्रपटाने गाजवलं बॉक्स ऑफिस, 100 कोटी क्लबमध्ये दणक्यात एण्ट्री

इमरान हाश्मी, मौनी रॉय आणि अनेक बॉलिवुड कलाकार शो टाईममध्ये दिसणार असून शशांक केतकर सारखा मराठमोळा चेहरा यात बघायला मिळणार आहे. अनेक सीरियलमध्ये काम करून मराठमोळा अभिनेता शशांक केतकरने चाहत्यांच्या मनात अनोखं स्थान निर्माण केलं. ‘होणार सून मी ह्या घरची’ सीरियलमध्ये मुख्य भूमिका साकारून शशांक घराघरात पोहोचला आहे. पहिल्याच सिरीयलने त्याला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर अनेक सिरीयल आणि चित्रपटांमध्ये शशांक मुख्य भूमिका साकारताना दिसला. आता शशांक करण जोहरच्या सीरिजमध्ये झळकणार आहे.

करण जोहरच्या ‘शो टाइम’ वेब सीरिजमध्ये इमरान हाश्मी, नसरुद्दीन शाह, मौनी रॉय, माहिमा मखवाना यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. याअगोदर शशांक ‘स्कॅम 2003’ या वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. सध्या शशांक ‘मुरांबा’ सिरियलमधून चाहत्यांची कायम मनं जिंकत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube