Manjummel Boys: ‘या’ साऊथ चित्रपटाने गाजवलं बॉक्स ऑफिस, 100 कोटी क्लबमध्ये दणक्यात एण्ट्री

Manjummel Boys: ‘या’ साऊथ चित्रपटाने गाजवलं बॉक्स ऑफिस, 100 कोटी क्लबमध्ये दणक्यात एण्ट्री

Manjummel Boys Crossed 100 Crore : गेल्या काही काळापासून बॉलीवूड (Bollywood) आणि साऊथ चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर (box office) मोठी स्पर्धा सुरू आहे. कोरोनाच्या काळापासून दक्षिणेकडील चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर दबदबा राहिला आहे. यामध्ये ‘पुष्पा’, ‘केजीएफ 2’, ‘कंतारा’ आणि ‘आरआरआर’ सारखे चित्रपट प्रदर्शित झाले आणि मोठा नफा कमवून इतिहास रचला. आता आणखी एक साऊथ चित्रपट चर्चेत आला आहे, ज्याचं नाव आहे ‘मंजुम्मल बॉईज’ (Manjummel Boys). हा मल्याळम भाषेतील चित्रपट असून, त्याने कमी काळातचं 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

‘मंजुम्मेल बॉईज’ 22 फेब्रुवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. चिदंबरम यांनी दिग्दर्शित केले होते. हा सर्व्हायव्हल थ्रिलर चित्रपट आहे. जगभरात 100 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने 12 दिवसांत हा आकडा पार केला आहे. 2024 मध्ये 100 कोटींचा टप्पा गाठणारा हा पहिला मल्याळम चित्रपट ठरला आहे. बिन शाहीर आणि श्रीनाथ यांनी यात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर त्याने कमालीची कमाई केली.

Maidaan Trailer : प्रतीक्षा संपली! अजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

एका सत्य घटनेवर आधारित: ‘मंजुम्मेल बॉईज’च्या कथेबद्दल बोलायचे झाले तर ती एका सत्य घटनेवर आधारित आहे. 2006 मध्ये तामिळनाडूमध्ये घडलेली एक वास्तविक घटना यात दाखवण्यात आली आहे. प्रदर्शित झाल्यानंतर तामिळनाडूमध्ये हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. 10 कोटींची कमाई करणारा हा पहिला मल्याळम चित्रपट ठरला आहे. त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल असे सांगितले जात आहे की, जर चित्रपटाची अशीच कमाई होत राहिली तर तो लवकरच तामिळनाडू बॉक्स ऑफिसवर 50 कोटींचा आकडा गाठेल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तर चित्रपटाचे बजेट 20 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच खूप कमी मल्याळम चित्रपट आहेत जे एवढ्या मोठ्या कमाईच्या आकड्याला गाठले आहेत. हा चित्रपटही कमाईच्या बाबतीत रजनीकांतच्या ‘लाल सलाम’ला मागे टाकण्यास सज्ज झाला आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत त्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन कसे होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube