Eros Theater पाडणार नाही तर… जाणून घ्या चर्चांमागील सत्य

Eros Theater पाडणार नाही तर… जाणून घ्या चर्चांमागील सत्य

Eros Theater will not Demolished : मुंबईतील अत्यंत जुन्या आणि ऐतिहासिक इमातींपैकी एक आणि वास्तुकलेचा एक उत्तम नमुना असेलेली इमारत म्हणजे इरॉस चित्रपटगृह. हे चित्रपटगृह केवळ मुंबईकरांसाठीच नाही तर चित्रपट रसिकांसाठी एखाद्या तीर्थस्थळाप्रमाणे आहे. मात्र 2017 पासून हे चित्रपटगृह तिकीट विक्रीवर परिणाम होत असल्याने बंद करण्यात आले होते.

मात्र गेल्या काही दिवसांपासून या इमारतीच्याभोवती आवरण तयार करण्यात आले आहे. त्यामुळे ही इमारत पाडण्याचं काम सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि स्टॅन्डअप कॉमेडियन वीर दास यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र या इमारतीच्याभोवती आवरण तयार करण्यामागे कारणं काही वेगळीच आहेत.

जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये राडा, VIDEO समोर

इमारत पाडण्याचं काम सुरू नाही तर तिची डागडुजी करून ती आणखी मजबूत करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आता तिच नुतनीकरण होणार असून तिच्या जिर्णोद्धार करण्याला मुंबई ऐतिहासिक वारसास्थळ संवंर्धन समितीकडून मंजूरी मिळाली आहे. ही वास्तू मरीन ड्राईव्ह जवळ चर्चगेट रेल्वे स्टेशन समोर महर्षि कर्वे रोड आणि जमशेदजी टाटा रोडच्या मध्यावर आहे.

या इमारतीचं नुतनीकरण झाल्यानंतर हे चित्रपटगृहाचा हॉल, तिकीट विभाग, 300 आसन व्यवस्था वाढवण्यात येणार आहे. ही इमारत ऐतिहासिक वारशांपाकी एक आहे. ते मुंबईतील पहिलं सिंगल स्क्रीन चित्रपटगृह आहे.

दरम्यान हे चित्रपटगृह पाडण्यात येणार असल्याच्या सोशन मिडीयावरील अफवांवर मुंबई महानगर पलिकेने देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितं की, ही इमारती पाडली जात नसून तिचा पुनर्विकास करण्यात येत आहे. 2018 मध्येत या कामाला मंजूरी मिळाली मात्र कोरोनामुळे हे काम लांबणीवर पडलं आहे. तर हे काम करताना या इमारतीच्या प्राचीन गोष्टींना धक्का लावला जाणार नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube