सुप्रसिद्ध पार्श्वगायक शैलेंद्र सिंग यांना “कृतज्ञता गौरव पुरस्कार” जाहीर
Shailendra Singh यांना स्व.अरुण पौडवाल यांच्या स्मृति प्रित्यर्थ देण्यात येणारा कृतज्ञता गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
Famous playback singer Shailendra Singh awarded with Gratitude Award : सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार स्व.अरुण पौडवाल यांच्या स्मृति प्रित्यर्थ देण्यात येणारा “कृतज्ञता गौरव पुरस्कार ” यंदा सुप्रसिद्ध पार्श्वगायक शैलेंद्र सिंग यांना जाहीर झाला आहे. कृतज्ञता गौरव पुरस्कार 2026 चं हे 29 वं वर्ष आहे.
मतांच्या दुष्काळातही निवडणुकांचा ‘नाद’ भारी; बिचुकले अन् करूणा मुंडेंचा पराभवाचा ‘रेकॉर्ड’ कायम!
शनिवार दिनांक 09 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल व पौडवाल कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये अनुराधाजींच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होईल. हा समारंभ अनुराधाजींच्या धैर्य रेसिडन्सी , खार ( पश्चिम) येथील राहत्या घरी संपन्न होईल. शाल , श्रीफळ , स्मृतिचिन्ह व रोख रक्कम रुपये – 51,000 /- असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कार सोहळ्याचे हे यंदाचे 29 वे वर्ष आहे.
राजा शिवाजी ठरला मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड करणारा चित्रपट
आजवर या पुरस्काराने सन्मानित झालेले मान्यवर पुढील प्रमाणे पार्श्वगायक- जी. मल्लेश , संगीतकार – राम कदम, यशवंत देव , प्रभाकर जोग , दत्ता डावजेकर , अशोक पत्की , संगीत संयोजक – श्यामराव कांबळे , पार्श्वगायिका उत्तरा केळकर , तालवादक – जयसिंग भोई , प्रमोद साने , संतूर वादक – उल्हास बापट , गीतकार – जगदीश खेबुडकर , शांताराम नांदगावकर , वंदना विटणकर , भावगीत गायक – अरुण दाते , गिटार वादक- रमेश अय्यर , सुनील कौशिक, ध्वनिमुद्रक – डी. ओ. भन्साळी , अविनंदन टागोर , हेमंत पारकर , सत्येन पौडवाल , युवा गायक – गिरीश संझगिरी , चंद्रशेखर महामुनी , मदन काजळे, त्यागराज खाडिलकर
पार्श्वगायक शैलेंद्र सिंग यांचा परिचय –
1973 साली प्रदर्शीत झालेल्या राज कपूर निर्मित व दिग्दर्शीत, ऋषी कपूर यांचे रुपेरी पडद्यावर पहिले पदार्पण असणाऱ्या ” *बॉबी ‘ या चित्रपटाद्वारे त्यांनी ” पार्श्वगायक म्हणून पदार्पण केले. संगीतकार लक्ष्मीकांत – प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेली त्यांची मै शायर तो नहीं, हम तुम एक कमरेमे बंद हो, ना मांगू सोना चांदी, मुझे कुछ कहना है, झूट बोले कौआ काटे… ही गाणी प्रचंड गाजली व ऋषी कपूर यांच्या साठी शैलेंद्र सिंग यांचा आवाज हे समीकरण रूढ झाले.
या जोडी ची काही गाजलेली गाणी –
तुमको मेरे दिल ने पुकारा है, किसीपे दिल अगर आ जाये तो क्या होता है – रफू चक्कर ( कल्याणजी – आनंदजी ),
हमने तुमको देखा – खेल खेल मे ( आर. डी. बर्मन ), होगा तुमसे प्यारा कौन – जमाने को दिखाना है ( आर. डी. बर्मन), जाने दो ना – सागर – ( आर. डी. बर्मन ), मेरे दिल से ये नही, साप से बढ के – जहरीला इन्सान ( आर. डी. बर्मन )
शैलेंद्र सिंग यांची या व्यतिरिक्त गाजलेली गाणी –
प्यार मे कभी कभी ऐसा हो जाता है – चलते चलते ( भाप्पी लाहिरी ), ‘तेरी रब ने बना दी जोडी, ऐ यार सून यारी ‘तेरी – सुहाग ( लक्ष्मी – प्यारे ), हम प्रेमी प्रेम करना जाने – परवारीश ( लक्ष्मी – प्यारे ), पुरवय्या लेके चली मेरी नैय्या – दो जासूस ( रवींद्र जैन ), ओ मेरी जान, झलक दिखाके कर गयी दिवाना – मंझिल मंझिल ( आर. डी. बर्मन ), मामेय्या केरो मामा – अर्जुन ( आर. डी. बर्मन ), आना रे आना रे, जयपूर से निकली गाडी – गुरुदेव ( आर. डी. बर्मन )
अभिनेते शैलेंद्र सिंग – शैलेंद्र सिंग यांना हिंदी चित्रपटात हिरो व्हायचे होते त्यांना अभिनयाची आवड होती त्यामुळे पुण्यातील FTII मधून त्यांनी अभिनयाचे शिक्षण घेतले. दो जासूस, 1975, जनता हवालदार, नौकर – 1979, ऍग्रिमेंट – 1980 या चित्रपटात त्यांनी अभिनय केला. शैलेंद्र सिंग यांनी मराठी मध्ये देखील लोकप्रिय गाणी गायली. संगीतकार अरुण पौडवाल यांनी त्यांच्या आवाजात मी जलवंती मी फुलवंती, सजणी मोहिनी तूच या जीवनी, हृदयी वसंत फुलताना ही लोकप्रिय गाणी गाऊन घेतली. या शिवाय त्यांची प्रीतीचं झुळ झुळ पाणी, ले लो भाई चिवडा ले लो – बन्या बापू ( ऋषी राज ) ही गाणी प्रसिद्ध आहेत.शैलेंद्र सिंग यांनी ‘ भुताचा भाऊ ‘ हा मराठी चित्रपट निर्माण केला होता ज्याचे संगीतकार अरुण पौडवाल होते.