गुलाबी साडी फेम गायक संजू राठोड उद्या कोपरगावमध्ये; नवरात्र उत्सव कार्यक्रमाला लावणार हजेरी
Singer Sanju Rathod in Kopargaon Tomorrow : चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केलेला प्रसिद्ध गायक संजू राठोड उद्या रविवार (दि.०६) रोजी आमदार आशुतोष काळे व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ कोपरगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी कोपरगाव शहरातील (Sanju Rathod) डॉ. बाबासाहेब आबेडकर मैदान या ठिकाणी सायंकाळी ६.०० वाजता उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
मोदी-शहांपासून महाराष्ट्राला धोका, त्यांना महाराष्ट्र संजय राऊतांचा घणाघात
सध्या सोशल मिडीयाचा जमाना असून सोशल मीडियावर एखादी गोष्ट ट्रेन्ड झाली की, ती सर्वत्र व्हायरल होते, याचा प्रत्यय सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होणाऱ्या ‘गुलाबी साडी’ या गाण्यावरून दिसून येत आहे. रस्त्यावरच्या चहाच्या टपरीपासून ते मोठमोठ्या पार्ट्यांमध्ये सातत्याने वाजणारे ‘गुलाबी साडी आणि लाली लाल लाल…दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ’ ह्या गाण्याच्या ओळी गुणगुणल्या जात आहेत. या गाण्याचा प्रसिद्ध गायक संजू राठोड नवनवीन गाण्यांमुळे अल्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे. त्याच्या गाण्यांनी सर्व प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.
आरक्षणाची मर्यादा हटवणार अन् जातीय जनगणना करणारच; राहुल गांधींची मोठी घोषणा
नवरात्र महोत्सवाचे औचीत्य साधत आमदार आशुतोष काळे व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ कोपरगाव यांच्या वतीने संजू राठोड यांच्या गीतांची मेजवानी रविवार (दि.०६) रोजी कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आबेडकर मैदान या ठिकाणी सायंकाळी ६.०० वाजता रसिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावं असं आवाहन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने करण्यात आलं आहे.