Muskan Narang : फॅशन डिझायनर मुस्कान नारंगने वयाच्या 25 व्या वर्षी संपवलं आयुष्य

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 29T141504.052

Fashion Designer Muskan Narang Suicide : उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथील लोकप्रिय फॅशन डिझायनर (Fashion Designer) मुस्कान नारंगने (Muskan Narang) आत्महत्या करत स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. वयाच्या २५ व्या वर्षी आत्महत्या करत तिने आपलं आयुष्य संपवलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Muskan Narang (@muskan_narang99)


फॅशन डिझायनर मुस्कान नारंगच्या बाबांनी म्हणजेच चंद्रप्रकाश नारंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्कान मुंबईवरुन आल्यापासून ती खूप नैराश्याचा सामना करत असल्याचे आम्हाला जाणवलं होतं. ती आली तेव्हा आम्ही सर्वांनी एकत्र जेवण केलं आणि झोपण्यासाठी ती तिच्या खोलीत निघून गेली. सकाळी आम्ही तिला आवाज देत होता, पण ती बाहेर आली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Muskan Narang (@muskan_narang99)


त्यामुळे आम्ही खिडकीतून तिला डोकावून बघितल तेव्हा ती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. मुस्कान नारंगच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस तपास करत आहे. मुस्कानने आत्महत्या करण्याअगोदर सुसाइड नोट लिहिली नाही. पोलीस अधिकारी अखिलेश सिंह भदौरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

मुस्कानने दिल्लीत फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला होता. त्यानंतर ती मुंबईतील एका कंपनीमध्ये फॅशन डिझायनर म्हणून काम करू लागली होती. आत्महत्या करण्याअगोदर मुस्कान सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होती. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिने आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते.

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती

मुस्कान या व्हिडीओमध्ये म्हणत आहे,”हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे. या व्हिडीओनंतर तुम्हाला मला बघता येणार नाही. आपल्या अडचणी, समस्यां दुसऱ्यांना सांगितल्यामुळे आपल्याला हलकं वाटतं, हा असा चुकीचा समज असल्याचे तिने यावेळी सांगितले आहे.

Tags

follow us