Fauj The Battle Of Hile: ‘फौज-द बॅटल ऑफ हिली’ सांगणार भारतीय सैन्य दलाची शौर्यगाथा

Fauj The Battle Of Hile: ‘फौज-द बॅटल ऑफ हिली’ सांगणार भारतीय सैन्य दलाची शौर्यगाथा

Fauj The Battle Of Hile Movie: 1971 मध्ये भारत- पाकिस्तान या दोन देशात झालेले एक महत्वपूर्ण युद्ध ठरले. (Marathi Movie ) याच युद्धावर आधारित ‘फौज-द बॅटल ऑफ हिली’ (Fauj The Battle Of Hile) हा मराठी सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे नवीन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर (Social Media) प्रदर्शित करण्यात आला आहे.

स्वामी चरण फिल्म्स, एम एन तातुसकर फिल्म्स प्रॉडक्शन, हर्ष जोशी प्रॉडक्शन निर्मित या मराठी सिनेमाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांचे आहे. 2024 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या मराठी सिनेमात अशोक समर्थ, किरण गायकवाड, सोमनाथ अवघडे उत्कर्ष शिंदे यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर मयूर तातुसकर, कुशन जोशी, महेश करवंदे ( निकम), निलेश रमेश चौधरी आणि अमृता धोंगडे निर्मात्याची धुरा सांभाळली आहे.

हे युद्ध इतिहासातील एक महत्वाचे युद्ध ठरले आहे. कारण या युद्धामध्ये भारताच्या विजयी झेंड्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच बांग्लादेश या नवीन देशाची स्थापना देखील करण्यात आली. या सगळ्यात बलिदान दिलेल्या शूरवीर सैनिकांची शौर्यगाथा या सिनेमाच्या माध्य्मातून आपल्या समोर मांडण्यात आली आहे.

Pranita Bora; श्रीकृष्णाशी संवाद साधणारी चित्रकला

सिनेमाबद्दल दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात की, ”या अगोदर देखील मी अशाच धाटणीचा सिनेमा केला आहे. यामुळे मला अशा रक्त असणाऱ्या कथा विशेष भावत असतात. हे पडद्यावर साकारणे थोडं अवघड आहे. परंतु निर्माते, कलाकार, इतर टीम यांच्या साथीने हा प्रवास सोपा होतो. इतिहासामध्ये अनेक वेगवेगळ्या लढाया, युद्धे झाली आहेत. परंतु या युद्धामुळे महत्वपूर्ण घटना घडली.

अंगावर शहारा आणणारी ही लढाई आतापर्यंतची सर्वात मोठी रक्तरंजित लढाई ठरली असणार आहे. या लढाईमध्ये पाकिस्तानचे दोन भाग झाले आहेत. ही लढाई निश्चितच सोपी नव्हती. भारतीय सैन्यांची हीच शौर्यगाथा पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. या निमित्ताने इतिहास पुन्हा जागवण्याचाही आम्ही एक प्रयत्न केला आहे. या सगळ्यात मला भूषण मंजुळे यांची कथा, पटकथा लाभल्याने हा सिनेमा चाहत्यांना अधिकच वास्तववादी वाटेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube