रश्मिका मंदाना स्टारर ‘मायसा’ चित्रपटाचा पहिला ग्लिम्प्स प्रदर्शित; चाहत्यांमध्ये वाढला उत्साह
Rashmika Mandanna : ‘मायसा’ ही भारतातील पहिली अशी पॅन-इंडिया फिल्म मानली जाते, ज्याचे नेतृत्व एका महिला स्टारकडे आहे. जबरदस्त अॅक्शन
Rashmika Mandanna : ‘मायसा’ ही भारतातील पहिली अशी पॅन-इंडिया फिल्म मानली जाते, ज्याचे नेतृत्व एका महिला स्टारकडे आहे. जबरदस्त अॅक्शन आणि ड्रामाने परिपूर्ण या फिल्ममध्ये मुख्य भूमिका साकारताना रश्मिका मंदाना दिसणार आहेत. ‘पुष्पा’, ‘अॅनिमल’ आणि ‘द गर्लफ्रेंड’सारख्या सुपरहिट चित्रपटांनंतर रश्मिका पुन्हा एकदा दमदार अंदाजात प्रेक्षकांसमोर येत आहेत.
रश्मिका मंदाना झळकणारी ‘मायसा’ ही फिल्म तिच्या सुरुवातीच्या झलकांपासूनच चर्चेत आहे. या चित्रपटाबद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस इतकी वाढली की तो वर्षातील सर्वाधिक चर्चिला गेलेला चित्रपट ठरू लागला. आणि आता, या प्रचंड क्रेझच्या दरम्यान शेवटी चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे. जी या वर्षातील सर्वात इंटेन्स ‘फर्स्ट ग्लिम्प्स’ म्हणून ओळख मिळवत आहे. या झलकमध्ये रश्मिका मंदाना त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वात खतरनाक आणि प्रभावी अवतारात दिसतात, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘मायसा’ हा चित्रपट या वर्षातील सर्वात रोमांचक सिनेमाई अनुभवांपैकी एक ठरण्याची दाट शक्यता आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेली ही झलक पूर्णपणे इलेक्ट्रिफाइंग आहे. दमदार ओपनिंग नॅरेशनसोबत रश्मिकाच्या ‘मायसा’ या व्यक्तिरेखेची ओळख करून दिली जाते. जळत्या जंगलाची दृश्ये आणि त्यासोबतची प्रभावी बॅकग्राउंड म्युझिक प्रचंड तीव्र आणि परिणामकारक वातावरण तयार करतात. चित्रपटाचे BGM या झलकला अधिक ताकद देत असून, ते रश्मिकाच्या राग, जिद्द आणि उपस्थितीला उत्तम साथ देते. क्रिटिक्स आणि प्रेक्षक दोघेही या ‘फर्स्ट ग्लिम्प्स’ची भरभरून प्रशंसा करत आहेत. रश्मिकाला इतक्या इंटेन्स आणि पॉवरफुल भूमिकेत पाहणे हा खरोखरच वेगळा आणि लक्षात राहणारा अनुभव ठरत आहे.
हा चित्रपट एक हाय-ऑक्टेन इमोशनल अॅक्शन थ्रिलर असल्याचे सांगितले जाते, जो प्रेक्षकांना गोंड जमातीच्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि रोचक जगात घेऊन जाईल. या चित्रपटात रश्मिका मंदाना एका गोंड महिलेची भूमिका साकारत आहेत. पूर्णपणे वेगळ्या आणि कधीही न पाहिलेल्या अवतारात. या व्यक्तिरेखेत तीक्ष्णता, राग आणि खोल भावनिक ताकद स्पष्टपणे जाणवते. ही भूमिका केवळ दमदारच नाही, तर प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवणारी आहे.
‘मायसा’च्या पहिल्या झलकानंतर नेटिझन्सचे भन्नाट रिअॅक्शन्स:
“मायसा म्हणून रश्मिका म्हणजे अगदी WILDFIRE 🔥🔥 स्क्रीन तिची तीव्रता सांभाळूच शकत नाही!”
“रश्मिकाने ही भूमिका पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतली आहे!”
“पॅन-इंडिया नंबर 1 हिरोईन — रश्मिकाची ‘मायसा’ म्हणजे एक MONSTER परफॉर्मन्स 👑🔥”
“मायसा म्हणून रश्मिका अविश्वसनीय आहेत!”
“जशीच मायसा एंट्री घेते… शहारे येणं ठरलेलं आहे!!!”
“रश्मिका ही भूमिका साकारत नाही — तीच ‘मायसा’ झाली आहे ❤️🔥 पूर्णपणे मास एनर्जी!”
“फिअर्स क्वीन रश्मिका!”
“‘मायसा’ हा रश्मिका मंदानाच्या सर्वात आयकॉनिक अवतारांपैकी एक ठरेल 👑🔥”
“मायसा म्हणून रश्मिका = MASS CINEMA 🔥🔥”
राम शिंदेंनी विधानसभेचा बदला घेतला… रोहित पवारांना जामखेडकरांनी नाकारलं-
‘मायसा’ला अनफॉर्म्युला फिल्म्सने निर्मिती केली असून दिग्दर्शन रवींद्र पुल्ले यांनी केले आहे. हा एक इमोशनल अॅक्शन थ्रिलर असून त्याची कथा आदिवासी भागांच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. दमदार व्हिज्युअल्स, भक्कम कथा आणि रश्मिका मंदानाचा संस्मरणीय परफॉर्मन्स असं सर्व काही देण्याचं आश्वासन हा चित्रपट देतो.
