Gaurav More: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे साकारणार ‘छोटे पंडित’ची भूमिका !

Gaurav More: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे साकारणार ‘छोटे पंडित’ची भूमिका !

Maharashtrachi Hasyajatra Gaurav More : छोट्या पडद्यावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा कॉमेडी शो तुफान लोकप्रिय आहे. या शोमधील कलाकारांनी मराठी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. विविध विषयावरील दमदार स्किट्स, विनोदाचं अचूक टायमिंग यामुळे शो चांगलाच लोकप्रिय आहे. (Social media) महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे (Gaurav More) सध्या त्याच्या कॉमेडीची दमदार बॅटिंग मॅडनेस मचाएंगे मधून प्रेक्षकांची मन जिंकत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)


हिंदी शो मधून सध्या गौरव प्रेक्षकांना मोहित करतोय. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कॉमेडी शोमध्ये गौरव मोरेने ‘आय एम गौरे मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा’ असे म्हणत विनोदाच्या टायमिंगमुळे प्रत्येकाच्या घराघरात लोकप्रिय झाला. गौरव नेहमीच अफलातून विनोदाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून आता ‘मॅडनेस मचाएंगे’ मध्ये गौरव मोरे “छोटे पंडित” ची भूमिका साकारणार आहे. त्याचा हा छोटू पंडित परफॉर्मन्स बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

गेल्या काही दिवसांपासून गौरवच्या या धमाकेदार कॉमेडीवर हिंदी प्रेक्षकही खळखळून हसत आहेत आणि तो प्रेक्षकांचं नॉन स्टॉप मनोरंजन करत आहे. नुकतच सध्या सोशल मीडिया वर गौरव आणि बॉलिवुड अभिनेत्री जूही चावला यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता आणि गौरव ने जुही ला त्याचा कॉमेडी ने एंटरटेन केलं होत.

Shah Rukh Khan: शाहरुखच्या चाहत्यांसाठी खुशखबर; अभिनेत्याने आगामी चित्रपटाबाबत दिली मोठी माहिती

गौरव आता नव्या एपिसोड मध्ये छोटे पंडित मधून काय धमाका करणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. “मॅडनेस मचाएंगे”मध्ये तुफान लोकप्रिय होत असून मराठी प्रमाणे हिंदीत सुद्धा त्याने आपल्या कमाल कामगिरी ने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. आगामी काळात ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटात झळकणार असून’ महापरिनिर्वाण’ या चित्रपटातही तो मुख्य भूमिका साकारणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज