Gautami Patil: ‘सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम’नंतर आता.., गौतमी पाटीलने केला खुलासा

WhatsApp Image 2023 01 18 At 6.16.47 PM

पुणे : आपल्या दिलफेक अंदाजानं महाराष्ट्रातल्या तरुणांना वेड लावणारी लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील(Gautami Patil) गाण्यांनतर आता चित्रपटांसह वेबसीरिजमध्ये झळकणार असल्याची माहिती समोर आलीय. दोन-तीन गाण्यांनतर आता एका चित्रपटासह वेबसीरिजचं काम सुरु असल्याचं गौतमी पाटीलने सांगितलंय. एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना तिने ही माहिती दिलीय.

गौतमी पाटील कोणत्या चित्रपटात(Movie) आणि वेबसीरिजमध्ये(Webseries) काम करणार आहे, त्याच्याबद्दल गौतमीने खुलासा केलेला नसून याबाबत आत्ता सांगता येणार नसल्याचं तिने सांगितलंय. दरम्यान, ‘सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम’ या गाण्याने गौतमी पाटीलला मोठी प्रसिध्दी मिळाल्याचं पाहायला मिळालंय. या गाण्यात झळकल्यानंतर आता गौतमी पाटीलला आता चित्रपटात काम करण्याची संधी मिळालीय.

‘घुंगरु’ (GhungruMovie) चित्रपटाचं सध्या शुटींग सुरु असल्याचं गौतमी पाटीलने सांगितलंय. तसेच घुंगरु चित्रपटात गौतमी पाटील झळकणार असल्याची चर्चा सुरु असतानाच गौतमी पाटील आता वेबसीरिजमध्ये दिसणार असल्याचं तिने सांगितलंय. सुरुवातीच्या काळात ऑर्केष्ट्राच्या माध्यमातून तिने काम सुरु केलं. त्यानंतर तिच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळत असल्याचं दिसून आलंय. आपल्या नृत्याच्या जोरावर गौतमीने महाराष्ट्रातल्या तरुणांना भूरळ पाडलीय. महाराष्ट्रातल्या लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच नागरिकांना आता गौतमी पाटील परिचित झालीय.

गौतमी नृत्यामुळेच सोशल मीडिया स्टार बनलीय. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे अनेक नृत्याचे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. नृत्य सादर करत असताना तिच्या हावभावांवरून तिला ट्रोल गेले. अनेक लावणी नृत्यांगनांनी तिच्यावर टिका केली. लावणी कलावंत सुरेखा पुणेकर यांनीदेखील गौतमीच्या नृत्यावर गालबोट ठेवल्याचं पहायला मिळालं होतं. गौतमी ही मुळची धुळ्याची आहे. तिचे शिक्षण कमी झाले आहे. डान्स शिकण्यासाठी ती पुण्यात आली, अशी माहिती तिने एका मुलाखतीत स्वत: दिली होती.

अनेकदा गौतमी पाटील वादाच्या भोवऱ्यातही अडकल्याचं समोर आलं होतं. नृत्य करताना अश्लील हावभाव केल्याचा आरोप गौतमी पाटीलवर करण्यात आला होता. त्यावेळीदेखील गौतमी चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा गौतमी पाटील चर्चेत आलीय. लवकरच ती चित्रपटानंतर आता वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. त्यामुळे आता तरुणांना मोठी उत्सुकता लागली.

दरम्यान, सोशल मीडियावर (SocialMedia) गौतमी पाटीलला चांगलीच प्रसिध्दी मिळाली असून सोशल मीडियावर तिचे अनेक फॉलोवर्स आहेत. गौतमीचे महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात चाहते असून आता गौतमीच्या वेबसीरिजसह चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळणार असल्याचं बोललं जातंय. अखेर गौतमी पाटीलला वेबसीरिजमध्ये पाहण्यासाठी अतिशय उत्साही असल्याचं दिसून येतंय.

Tags

follow us