गौतमीच्या अदाकारीने आता महिलाही होणार घायाळ; तब्बल एवढ्या महिलांनी केले तिकीट बूक

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 06T171307.922

Gautami Paitl Dance Show :  महाराष्ट्रामध्ये सध्या गौतमी पाटील हे नाव सर्वत्र गाजते आहे. गौतमी पाटीलच्या डान्सच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची तुफान गर्दी पहायला मिळते. ग्रामीण भागात गौतमीच्या कार्यक्रमाला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. तिच्या कार्यक्रमांमध्ये गर्दी नियंत्रित न झाल्याने अनेकवेळा धिंगाणा झाल्याचेदेखील समोर आले आहे. तर तिचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोक छपरावर उभे असताना छप्पर कोसळलेले देखील आपण पाहिले आहे. अशा प्रकारे तिच्या कार्यक्रमांना तुफान प्रतिसाद मिळतो आहे. यानंतर आता चक्क महिला तिच्या कार्यक्रमाला येणार आहेत.

नाशिकमध्ये आज गौतमी पाटीलचा लेडिज स्पेशल शो रंगणार आहे. महिला आणि युवतींच्या प्रचंड मागणीमुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी महिलांना 40 टक्के सूट देण्यात आलेली आहे. अ‍ॅमब्युलन्सच्या निधी संकलनासाठी हा कार्यक्रम करण्यात येत आहे. या कार्यक्रमात 700 पेक्षा जास्त सीट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर 150 पेक्षा जास्त युवतींनी या कार्यक्रमासाठी ग्रुप बुकिंग केले आहे. त्यामुळे युवती व महिलांच्या कार्यक्रमामुळे हा कार्यक्रम आगळावेगळा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

Cannes Film Festival 2023 : ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ला आजपासून सुरुवात; ‘या’ अभिनेत्रीचा रेड कार्पेटवर डेब्यू!

दरम्यान, गौतमीला नुकतंच एका मुलाखतीत लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने लाजत उत्तर दिले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तुम्ही एका मुलाखतीत लग्नाबद्दल बोलला होतात. अनेक तरुणांना तुम्ही लग्न कधी करणार आहात, हा प्रश्न पडला आहे? असे तिला विचारण्यात आले होते. यावर तिने अजून तरी मी लग्नाचा विचार केला नाही. पण जेव्हा लग्न ठरेल, तेव्हा मी तुम्हाला सर्वांना आवर्जुन सांगणार आहे. सर्वांना पत्रिका देखील देईन, असे तिने यावेळी सांगितले आहे.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

Tags

follow us