Parineeti Chopra: जेनेलिया नव्हे तर ‘या’ अभिनेत्री बनल्या राजकीय घराण्याची सून

Parineeti Chopra: जेनेलिया नव्हे तर ‘या’ अभिनेत्री बनल्या राजकीय घराण्याची सून

Parineeti Chopra Raghav Chadha : बॉलिवूडची अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांचा आज नवी दिल्लीत साखरपुडा होणार आहे. (Actress Politician Love) नवी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये त्यांचा साखरपुडा होणार आहे. या शाही साखरपुड्याकडे सर्वच चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांना आजवर अनेकवेळा स्पॉट करण्यात आले आहे. (Actress Politician Love) त्यांच्या डेटिंगच्या चर्चा देखील जोरदार रंगल्या आहेत. अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर आज त्यांच्या साखरपुड्याचा दिवस उजाडला आहे.

१. परिणीती चोप्रा आणि राघव: (Parineeti Chopra Raghav Chadha) परिणीती चोप्रा आणि राघव यांना यापूर्वी अनेकदा एकत्र पाहण्यात आले आहे. परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी मुंबईत राघव चड्ढासोबत लंच डेटवर दिसली होती, आणि तेव्हापासून सोशल मीडियावर दोघांची लवकरच लग्न होऊ शकते अशी जोरदार चर्चा आहे. परिणीती आणि राघव यांनी लंडन स्कूलमधून एकत्र शिक्षण घेतले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)


२. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसोझा: (Riteish Deshmukh and Genelia DSouza) आणखी एक प्रसिद्ध जोडपे म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसोझा, जेनेलिया डिसूझा हे भारतीय राजकारणी विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुख यांच्या प्रेमात पडली. ज्यांनी महाराष्ट्राचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून काम केले. या जोडीला बॉलिवूडमधील सर्वात आवडते जोडपे मानले जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)


दोघांची पहिली भेट 2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’च्या सेटवर झाली होती. या चित्रपटाद्वारे दोघांनी एकत्र बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि या चित्रपटानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि येथूनच त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. या जोडप्याने 2012 मध्ये एका भव्य सोहळ्यात लग्न केले. रितेश आणि जेनेलियाच्या लग्नाचा समावेश इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट लग्नांच्या यादीत होतो.

‘TMKOC च्या’ निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर आत्माराम भिडेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

३. आयशा टाकिया आणि फरहान आझमी : (Ayesha Takia and Farhan Azmi) ‘टारझन द वंडर कार’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री आयशा टाकियानेही एका राजकारण्याच्या मुलाशी लग्न केले. आयशा समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमीच्या प्रेमात पडली. 2009 मध्ये त्यांचे लग्न झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by 🧿Ayesha Takia Azmi (@ayeshatakia)


४. स्वरा भास्कर आणि फहाद अहमद: (Swara Bhaskar and Fahad Ahmed) यासोबतच अभिनेत्री स्वरा भास्करनेही समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदला आपले प्रेम दिले आहे. या बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडाली, स्वरा भास्करने यावर्षी फहाद अहमदसोबत लग्न केले. कोर्टात लग्नगाठ बांधल्यानंतर दोघांनी हिंदू आणि मुस्लिम रितीरिवाजानुसार त्यांनी लग्न केले आहे .

 

View this post on Instagram

 

A post shared by Brides Today (@bridestodayin)


याआधी स्वराने फहादला तिचा चांगला मित्र म्हटले होते, पण 6 जानेवारीला या जोडप्याने कोर्टात लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. या जोडप्याच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होत आहे. तसेच अनेकांनी त्याच्यावर अनेक चांगल्या-वाईट कमेंट्स देखील केल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube