Ghar Banduk Biryani : ‘घर बंदूक बिरयानी’चा धिंगाणा, नागराजचा हलगीवर आकाश-सायलीने धरला ठेका

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 08T160101.961

Ghar Banduk Biryani Review : ‘घर बंदूक बिरयानी’ (Ghar Banduk Biryani) हा नवाकोरा सिनेमा घेऊन नागराज मंजुळे चाहत्यांच्या भेटीला आला आहे. (Ghar Banduk Biryani Review) या चित्रपटात नागराज मंजुळे (Nagraj Manjule) एका दबंग पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसून आला आहेत. तर ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाचे कलाकार जोरदार प्रमोशन करत असताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shashank Sane (@saneshashank)


या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टीमने पुण्यात हजेरी लावली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमाच्या दरम्यान नागराज मंजुळे हलगी वाजवत असल्याचे दिसून येत आहे. नागराज मंजुळेंना हलगी वाजवण्याचा खूप मोठा नाद आहे, त्यानं हलगी वादनाचा मनसोक्त आनंद लुटत असल्याचे दिसून येत आहे.

नागराज मंजुळेंच्या हलगीच्या तालावर आकाश ठोसर आणि सायली पाटील चांगलाच धमाकेदार ठेका धरला आहे. नागराज मंजुळेंच्या हलगी वादनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. अण्णांचा हा हटके अंदाज बघून चाहते देखील अवाक झाले आहेत. या व्हिडीओवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंटही केल्याचे दिसून येत आहेत.

Shreyas Talpade: ‘अब रुल पुष्पा का…’, ‘पुष्पा २’चा टीझर शेअर करत श्रेयस तळपदेची खास पोस्ट

‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपट ७ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात आकाश ठोसर, सायली पाटील, नागराज मंजुळे व सयाजी शिंदे मुख्य भूमिकेत आहे. नागराज मंजुळेंनी या चित्रपटाची निर्मिती केली असून हेमंत अवताडेंनी दिग्दर्शन केलं आहे. चाहत्यांनी या चित्रपटावर भरभरून प्रेम करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Tags

follow us