Gautami Patil: ‘या’ कारणांमुळे गौतमीच्या ‘घुंगरू’ सिनेमाची रिलीज डेट ढकलली पुढे…

Gautami Patil: ‘या’ कारणांमुळे गौतमीच्या ‘घुंगरू’ सिनेमाची रिलीज डेट ढकलली पुढे…

Gautami Patil: ‘सबसे कातिल गौतमी पाटील’ (Gautami Patil) तसेच लावणी क्वीन ही कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहते. कधी टीव्हीवर तर कधी सोशल मीडियावर (Social media) तीच्या प्रत्येक गोष्टीची काहींना काही चर्चा सुरूच असते. गौतमी सिनेमात एन्ट्री करणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. घुंगरू या आगामी सिनेमात मुख्य भुमिकेत गौतमी पाटील काम करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gautami Patil (@official_gautami941__)


लावणी क्वीन गौतमी ही आता अभिनय क्षेत्रात झळकणार हे ऐकताच तिच्या चाहत्यांनी तिला मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिले आहेत. सोशल मीडियावर गौतमीचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत. आता या घुंगरू सिनेमाची (Ghungroo) रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. (Marathi Movie) अशी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राची सद्या राजकीय परिस्थिती बघता आगामी सिनेमा  घुंगरूची प्रदर्शित होणारी तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. चाहते या सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.

लावणीच्या क्षेत्रात गौतमीने चांगलंच नाव कमवलं आणि आता ती मोठ्या पडद्यावर ही झळकणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर गेल्या काही दिवसापासून चाहत्यांना भेटीला आले आहे. या सिनेमाची निर्मीती आणि दिग्दर्शन बाबा गायकवाड यांनी केले आहे. या सिनेमाचे रिलीज होणारी तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे गौतमीच्या चाहत्यांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. राज्याची राजकीय परिस्थिती बघता, येत्या आठवड्यामध्ये या सिनेमाची रिलीज डेट सांगण्यात येणार असे बाबा गायकवाड यांनी यावेळी सांगितले आहे.

Mission Impossible 7 सह सिनेमा गृहात रिलीज होणार किंग खानच्या ‘जवान’चा ट्रेलर

गौतमी ही तिच्या अश्लिल कृत्यामुळे चांगलीच चर्चेत राहिली आहे. चाहते या सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. या सिनेमातील तिच्या भुमिकेकडे सर्वांचेच लक्ष वेधले लागले आहेत. या सिनेमाची शुटींग परदेशात ही झाली आहे. राज्यभरात गौतमीला कोणत्याही कार्यक्रमात नाचण्यासाठी बोलवलं जाते. तिच्या अश्लिल कृत्यामुळे सोशल मीडियावर ती तुफान व्हायरल होत असते. ‘सबसे कातील गौतमी पाटील’ अशी ओळख तिला सोशल मीडियावरून मिळाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube