‘गोंधळ’ची महाराष्ट्रात जोरदार चर्चा; पारंपरिक गोंधळाच्या स्वरात प्रेक्षकांचा जल्लोष

या परंपरेचा सन्मान राखत, चित्रपटगृहाबाहेर पारंपरिक गोंधळी मंडळींनी खास विधीपूर्वक अभिषेक करून चित्रपटाचा शुभारंभ केला.

  • Written By: Published:
News Photo   2025 11 14T173217.065

महाराष्ट्रभर नुकताच प्रदर्शित झालेला ‘गोंधळ’ हा चित्रपट सध्या (Film) सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती आणि आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षक या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देत आहेत. या चित्रपटाबाबत लक्षणीय बाब म्हणजे ‘गोंधळ’ हा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतल्या अत्यंत पारंपरिक, धार्मिक आणि कलात्मक घटक असलेल्या ‘गोंधळ’ या परंपरेवर आधारित आहे.

या परंपरेचा सन्मान राखत, चित्रपटगृहाबाहेर पारंपरिक गोंधळी मंडळींनी खास विधीपूर्वक अभिषेक करून चित्रपटाचा शुभारंभ केला. गोंधळातील पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि देवांच्या नावाचा जयघोष करत या मंडळींनी ‘गोंधळ’ चित्रपटाचा आनंद घेतला. ‘गोंधळ’ या परंपरेला, कलेला वाखाणणारा हा चित्रपट असून यानिमित्ताने आम्हाला महत्व मिळाल्याचा अभिमान वाटतो. त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. आमची प्राथमिक जबाबदारी म्हणून आम्ही हा अभिषेक केल्याच्या भावना गोंधळी मंडळींनी व्यक्त केल्या.

“रॉक ऑन पुन्हा बनला तर तूच होशील बँड लीडर!” शिबानी दांडेकरांनी केली अंशिकाची प्रशंसा

‘गोंधळ’या चित्रपटात महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली लोककला, श्रद्धा, आणि संस्कृती यांचा समृद्ध आविष्कार आहे. या चित्रपटाने कलात्मकतेसोबतच तांत्रिक बाबींमध्येही जणू नवा मापदंड निर्माण केला आहे. कॅमेऱ्याचे अप्रतिम दृष्यबंध, उत्कृष्ट छायाचित्रण, परिपूर्ण संपादन आणि जागतिक दर्जाच्या ध्वनीमिश्रणामुळे ‘गोंधळ’हा चित्रपट पाहाताना एक दृश्य-सांस्कृतिक मेजवानी ठरत आहे.दिग्दर्शक संतोष दवखर यांनी आपल्या दिग्दर्शनातून महाराष्ट्राच्या लोकपरंपरेला आधुनिक रुप देत ती जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक संतोष डावखर म्हणतात, “प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम अवर्णनीय आहे. गोंधळी बांधवांनी आमच्या चित्रपटाच्या पोस्टरला केलेला पारंपरिक अभिषेक ही आमच्यासाठी खरी आशीर्वादाची गोष्ट आहे. आम्ही ‘गोंधळ’ हा चित्रपट पूर्ण श्रद्धेने आणि प्रेमाने केला आणि आज प्रेक्षकांच्या प्रतिसादातून ते प्रेम परत मिळत आहे, यापेक्षा मोठा आनंद नाही. प्रेक्षकांना ‘गोंधळ’ आवडत आहे, हेच आमच्यासाठी सर्वात मोठं यश आहे.’’

‘गोंधळ’ची कथा, पटकथा आणि संवाद स्वतः संतोष डावखर यांनी लिहिले असून डावखर फिल्म्स निर्मित या चित्रपटाच्या सहनिर्मात्या दीक्षा डावखर आहेत. या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील आणि ध्रुव ठोके हे नामवंत कलाकार प्रमुख भूमिकेत झळकले आहेत.

follow us