Kajal Aggarwal Birthday: टॉपलेस फोटोशूट ते साऊथ इंडस्ट्रीत बॅन! सिंघम गर्ल का अडकलीय वादात?

Kajal Aggarwal Birthday: टॉपलेस फोटोशूट ते साऊथ इंडस्ट्रीत बॅन! सिंघम गर्ल का अडकलीय वादात?

Happy Birthday Kajal Aggarwal: ‘सिंघम’ फेम (Singham fame) अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) ही अभिनयासोबतच अनेक वादांमुळे देखील प्रसिद्धी झोतात आली होती. (Kajal Aggarwal Birthday) ‘सिंघम’ अभिनेत्री काजल अग्रवाल आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. काजलला बॉलिवूड (Bollywood) सिनेमांपेक्षा साऊथच्या सिनेमामध्ये जास्त यश मिळाले आहे. काजल अग्रवाल ही विशेषत: तेलुगू इंडस्ट्रीत सर्वात जास्त गाजली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajal A Kitchlu (@kajalaggarwalofficial)


आपल्या अभिनयाने चाहत्यांचे मनोरंजन करणारी काजल अग्रवाल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती अनेकवेळा तिचे फोटो शेअर करत असते. अभिनयाबरोबरच काजल अग्रवाल ही अनेक वादांमुळे देखील प्रसिद्धी झोतात आली होती. काजल अग्रवालचा जन्म १९ जून १९८५ रोजी एका पंजाबी कुटुंबात झाला आहे. काजलचे शिक्षण मुंबईतील सेंट अॅन्स हायस्कूलमध्ये झाले आहे. यानंतर तिने’ केसी कॉलेज मुंबईतून मास मीडिया स्ट्रीममध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. काजलने पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. काजलने एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितले आहे की, तिला लहानपणापासूनच पत्रकार बनायचे होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajal A Kitchlu (@kajalaggarwalofficial)


परंतु काळाच्या ओघाने तिला अभिनेत्री बनवले आहे. सिनेमात येण्याअगोदर काजलने एमबीएचे शिक्षण घेण्याची योजना आखली होती. पण, त्यात देखील ती अयशस्वी ठरली असल्याचे यावेळी सांगितले होते. मनोरंजन विश्वामध्ये नशीब आजमवण्यासाठी काजळ २००४ मध्ये ‘क्यों हो गया ना’ च्या ऑडिशनला पोहोचली होती, आणि या सिनेमामध्ये तिची निवड देखील करण्यात आली होती. या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र या सिनेमात तिला एक छोटीशी भूमिका मिळाली होती. काजलने ‘लक्ष्मी कल्याणम’ या सिनेमातून अभिनेता कल्याण रामबरोबर तेलुगू सिनेमा जगतात पदार्पण केले होते.

काजलला तिचे पहिले व्यावसायिक यश तेलुगू सिनेमा ‘चंदामामा’ मधून मिळाले होते. २००९च्या ‘मगधीरा’ या सिनेमाने तिच्या कारकिर्दीला एक मोठी कलाटणी दिली गेली होती. या सिनेमाच्या यशानंतर काजलने कधी देखील मागे वळून बघितले नाही. ‘मगधीरा’ या सिनेमामध्ये अभिनेता रामचरण तेजा मुख्य भूमिकेत होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटीपेक्षा जास्त कमाई केली होती. याबरोबरच काजलला सर्वोत्कृष्ट तेलुगू अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठीही नामांकन देण्यात आले होते. काजल अग्रवालचे नाव अनेकवेळा वादांमध्ये अडकले आहे. २०१४मध्ये एका मासिकासाठी तिने केलेले टॉपलेस फोटोशूट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते.

Ketaki Chitale: केतकी चितळे वादग्रस्त पोस्टमुळे पुन्हा चर्चेत, आता नेमके काय झाले?

काजलच्या म्हणण्यानुसार तिने असे कोणतेही फोटोशूट केले नव्हते. आपल्या फोटोंशी छेडछाड करण्यात आल्याचा दावा तिने यावेळी केला होता. ‘दो लफ्जों की कहानी’ या बॉलिवूड सिनेमात काजल आणि रणदीप हुड्डा यांचा लिपलॉक सीन होता. काजलने दिलेल्या माहितीनुसार तिला या सीनची अगोदर माहिती नव्हती आणि रणदीप हुड्डाने अचानक तिचे चुंबन घेतले होते. याचा राग काजलला आला होता. नंतर सिनेमा निर्मात्यांनी तिची समजूत घातल्यावर तिचा राग शांत झाला होता. तसेच २०११मध्ये तामिळ आणि तेलुगू सिनेमासृष्टीमध्ये काजल अग्रवाल हिच्यावर बंदी घालण्याची योजना आखली जात होती. काजलचे एक वक्तव्य या संपूर्ण प्रकरणाला कारणीभूत ठरले गेले होते. काजल अग्रवाल हिने स्वतःला उत्तर भारतीय अभिनेत्री असल्याचे सांगितले होते. मात्र नंतर याची सारवासाराव करत असताना आपला मुद्दा चुकीच्या पद्धतीने मांडला गेला, असा सूर काजल अग्रवाल हिने लावला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube