Download App

Sanjay Narvekar Birthday: केवळ ‘देढ फुटिया’ भूमिकेमुळे बदलले अभिनेत्याचे आयुष्य! वाचा अभिनेत्याबद्दल…

Happy Birthday Sanjay Narvekar: आपल्या हटके अभिनयाने केवळ मराठीच नव्हे तर, हिंदी मनोरंजन (Entertainment) विश्व गाजवणारे अभिनेत्यांच्या यादीमध्ये संजय नार्वेकर यांचं नाव पहिल्या नंबरवर असते. अलीकडेच मराठी मनोरंजन विश्वामध्ये आपले नाव धुमाकूळ घालत असताना, दुसरीकडे आपल्या दमदार अभिनय कौशल्याने संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांनी हिंदी भाषेत देखील चाहत्यांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन केले आहे. आज (१७ जुलै) अभिनेते संजय नार्वेकर (Sanjay Narvekar Birthday) आपला वाढदिवस साजरा करत आहेत.


या निमित्ताने आज आपण त्यांच्याबद्दल आयुष्यातील काही गोष्टी जाणून घेणार आहोत. संजय नार्वेकर यांचा जन्म मालवणमधील एका गावात झाला आहे. लहानपणापासून आगाऊ असणाऱ्या संजय नार्वेकर यांना अभ्यासामध्ये  फारस रस नसल्याचे त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. शालेय शिक्षण पूर्ण करून त्यांनी कॉलेजचा कसातरी टप्पा गाठला होता. त्यावेळी त्यांचा एक मित्र कॉलेजमधील ड्रामा ग्रुपमध्ये त्यांना सहभागी करण्यात आला होता. दरम्यान या नाटकाच्या ग्रुपची तालीम देखील चांगलीच सुरू होती. त्यावेळी त्यांच्यातील एका मुलाने हा नाटक ग्रुप सोडला.

अभिषेक बच्चन राजकारणात प्रवेश करणार? ‘या’ पक्षाकडून लढणार लोकसभा निवडणूक

गेल्या काही दिवसापासून एक स्पर्धा होणार असल्याने या ग्रुपला एका अभिनेत्याची खूपच गरज होती. अशा परिस्थितीमध्ये एका मित्राने संजय नार्वेकर यांना अभिनय करण्याची विनंती केली होती. अभिनयात रस नसताना देखील फक्त मित्रा खातीर संजय नकार देऊ शकले नाहीत. त्यांनी ती भूमिका उत्तम प्रकारे स्वीकारली होती. परंतु या पहिल्या नाटकानंतर त्यांच्यामध्ये  अभिनयाची गोडी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले होते. यानंतर पुन्हा एकदा संजय नार्वेकर यांचा एक मित्र त्यांना नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत पाटील यांच्याकडे भेटायला घेऊन गेला. त्यावेळी देखील कोणताही सराव न करता तू संवाद म्हणू शकतो का? असा सवाल त्यांना करण्यात आला होता.

यावर संजय नार्वेकर यांनी लगेच ‘हो’ असे उत्तर त्यांनी दिले होते. त्यांचा आत्मविश्वास बघूनच त्यांना त्या नाटकात काम मिळाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते. दरम्यान या काळातमध्ये संजय नार्वेकर यांनी ‘ऑल द बेस्ट’ हे नाटक केले होते. त्यांचे हे नाटक संपूर्ण चाहत्यांना हादरवून टाकले होते. पुन्हा त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. परंतु अभिनयाऐवजी संजय नार्वेकर यांना खेळामध्ये खूप रस असल्याचे दिसून येत होते. ‘मी अभिनेता नसतो तर, क्रिकेटर किंवा फुटबॉलपटू नक्कीच झालो असतो’, असे ते कायम म्हणताना दिसून येतात. हिंदी सारख्या ‘वास्तव’ या सिनेमात ‘देढ फुटिया’ या भूमिकेने संजय नार्वेकर यांचे नशीबक अगदीच बदलून गेले.

ही भूमिका मिळण्या पाठीमागे देखील रंजक असा किस्सा आहे. सुरुवातीला ‘वास्तव’ सिनेमातील या भूमिकेसाठी दुसऱ्याच एका कलाकाराला फायनल करण्यात आले होते. परंतु अचानक त्या कलाकाराने ही भूमिका साकारण्यास नकार दिला होता. त्यावेळेस संजय नार्वेकर मित्रांसोबत फिरत असताना त्यांना एक मेसेज मिळाला. ज्यात महेश मांजरेकर यांनी त्यांना ऑफिसमध्ये भेटायला बोलवले होते. ऑफिसमध्ये आल्यानंतर महेश मांजरेकर यांनी केवळ त्यांच्याकडे बघितलं आणि सांगितलं की, ‘तू माझ्या सिनेमात ‘देढ फुटिया’ नावाची भूमिका करायचे आहे. एका क्षणात त्यांना ही भूमिका मिळाल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Tags

follow us