Love Story: बालमैत्रिण ते पत्नी… अशी होती ‘वरुण धवन नताशा दलाल’ची लव्ह स्टोरी!

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 24T164830.166

Varun Dhawan Love Story: बॉलिवूड अभिनेता वरूण धवनचा आज वाढदिवस (Varun Dhawan Birthday) आहे. तो आज त्याचा ३६ वा वाढदिवस (36th birthday) साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहते आणि बॉलिवूडमधील (Bollywood) कलाकार मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. वरुणच्या बायकोचे नाव नताशा दलाल (Natasha Dalal) आहे. दोघांनी २ वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)


आज वरुणच्या वाढदिवसानिमित्त त्याची आणि नताशाची लव्ह स्टोरी माहिती करून घेणार आहोत. करीनाच्या चॅट शो ‘वॉट वुमन वॉन्ट’या कार्यक्रमातमध्ये वरुण धवन पाहुणा म्हणून आला होता. त्यावेळी त्याने त्याच्या आणि नताशाच्या रिलेशनशिपविषयी आणि त्यांच्या प्रेमाची सुरूवात कशी झाली, याविषयी माहिती दिली होती. बालपणीची मैत्रीणीला मी सहावीमध्ये असताना नताशाला भेटलो होतो. तेव्हा आम्ही रिलेशनशिपमध्ये नव्हतो.

अकरावी किंवा बारावीपर्यंत आम्ही चांगले मित्र म्हणून राहिलो होतो. पण मला आठवतंय की जेव्हा मी तिला पहिल्यांदा बघितले होते तेव्हा आम्ही मॅनेकेजी कूपर या शाळेमध्ये शिकत होतो. ती यलो हाऊस आणि मी रेड हाऊसमध्ये राहत होतो. आम्ही बास्केटबॉलच्या कोर्टमध्ये होतो आणि दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली की ते आम्हाला स्नॅक्स देत असायची. अजुन देखील मला ती समोरुन येत असलयाचे कधी कधी आठवते.

सचिन तेंडुलकरचे 5 विक्रम एका क्लिकवर, रेकॉर्ड्स मोडणं मुश्कील, आजूबाजूला एकही फलंदाज नाही

मी तिला बघितलं आणि मला असे वाटले की मी तिच्या प्रेमात पडलो आहे. तिने मला ३ ते ४ वेळा नकार दिला होत. पण मी कधीही आशा सोडली नव्हती. वरुण आणि नताशा यांनी २४ जानेवारी २०२१ रोजी लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक कलाकारसह राजकारणी नेते उपस्थित राहिले होते. लहानपणीचे मित्र असलेले वरुण आणि नताशा अनेक वर्षे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. त्यानंतर त्यांनी लग्न केले आहे.

Tags

follow us