पठाणमधील जॉन अब्राहमचा लूक पाहिलात का ?

पठाणमधील जॉन अब्राहमचा लूक पाहिलात का ?

मुंबई : ‘पठाण’ चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम लीड रोलमध्ये आहे. तर नुकतचं चित्रपटातील जॉन अब्राहमचा लूक समोर आला आहे. चित्रपटात जॉन अब्राहम खलनायकाच्या भूमिकेत आहे. ज्याचं नाव जिम आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने यापूर्वी खुलासा केला होता की, ते जॉनला पठाणमध्ये सुपर स्लिक अवतारात सादर करणार आहे.

2022 वर्षात, शाहरुख खानने बॉलिवूडच्या ‘ब्रह्मास्त्र’, ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’ आणि ‘लाल सिंह चड्ढा’ मध्ये कॅमिओ भुमिका केल्या होत्या. तर 2023 मध्ये शाहरुख खानचे चाहते त्याला मुख्य भुमिकेत पाहू शकणार आहेत. 2023 मद्ये तो एक नाही तर तीन-तीन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्यामध्ये ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ रिलीज होणार आहे.

‘पठाण’ थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी जेमतेम दोन महिने उरले आहेत, अशा परिस्थितीत शाहरुख खानही त्याच्या आगामी अॅक्शन चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्याच्या तयारीत आहे. ‘पठाण’ सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेला अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. त्याचा स्क्रीनप्ले श्रीधर राघवन लिहिला आहे.

‘पठाण’ चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम लीड रोलमध्ये आहे. यशराज फिल्म्सने प्रोड्यूस केल आहे. नुकतेच 12 डिसेंबरला चित्रपटाचे पहिले गाणे प्रदर्शित झाले. ‘बेशरम रंग’ असं या चित्रपटाचं नाव आहे. तर ‘पठाण’ पुढील वर्षी 25 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube