HC Restrains 100 Rogue Websites: दिल्ली उच्च न्यायालयाने पायरेसी विरुद्ध घेतला कठोर निर्णय,100 वेबसाइट्ला बसला झटका
HC Restrains 100 Rogue Websites: दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) कठोर भूमिका घेत 100 पेक्षा जास्त वेबसाइट्सना बहुप्रतिक्षित अॅनिमेटेड सिनेमा “स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स” (Spider Man Across the Spider Verse) स्ट्रीमिंग किंवा होस्ट करण्यापासून रोखले आहे. 29 मे रोजी दिलेल्या आदेशात न्यायमूर्ती सी हरी शंकर यांनी इंटरनेट सेवा प्रदात्यांना (ISPs) या उल्लंघन करणाऱ्या वेबसाइट्सचा प्रवेश ब्लॉक करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
Delhi High Court restrains over 100 rogue websites from streaming movie Spider-Man: Across The SpiderVerse
Read more: https://t.co/KLQ4O1jVjB pic.twitter.com/4zkK6o7Pz2
— Bar and Bench (@barandbench) May 31, 2023
न्यायालयाने याप्रकरणी अधिसूचना जारी करण्याचे आदेश देखील सरकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. सामग्री निर्मात्यांच्या अधिकारांचे रक्षण करणे आणि कॉपीराइट केलेल्या सामग्रीचे बेकायदेशीर वितरण रोखणे हे या हालचालीचे उद्दिष्ट आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे हे महत्त्वाचे पाऊल ऑनलाइन पायरसी विरुद्ध सुरू असलेल्या लढ्याचे स्मरण करून देणारे आहे आणि बौद्धिक संपदा अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आपली वचनबद्धता अधोरेखित करते.