Fussclass Dabhade: खुळ्या भावंडांची इरसाल गोष्ट ‘फसक्लास दाभाडे!’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Fussclass Dabhade: खुळ्या भावंडांची इरसाल गोष्ट ‘फसक्लास दाभाडे!’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Fussclass Dabhade Upcoming Movie: दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच सुपरहिट चित्रपट दिले आहेत. (Marathi Movie) त्यांच्या चित्रपटांची खासियत म्हणजे ते वास्तववादी असल्याने प्रेक्षक त्याच्याशी एकरूप होऊ शकतात. नुकतेच ‘झिम्मा’ या चित्रपटाचे दोन भाग प्रचंड गाजले. (Social Media) आता आपल्या गावच्या मातीतील चित्रपट घेऊन हेमंत ढोमे पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावरून ‘फसक्लास दाभाडे’ या (Fussclass Dabhade Movie) आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली असून येत्या 15 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by LetsUpp Marathi (@letsupp.marathi)


खुळ्या भावंडांची इरसाल स्टोरी यात पाहायला मिळणार आहे. टी सिरीज आणि आनंद एल. राय प्रस्तुत, कलर यल्लो आणि चलचित्र मंडळी प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे लेखनही हेमंत ढोमे यांनीच केले आहे. तर क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याच बरोबर या चित्रपटात अजूनही काही कलाकारांची फौज आहे असे कळले आहे. भूषण कुमार, आनंद एल. राय, क्षिती जोग आणि कृष्णा कुमार या चित्रपटाचे निर्माते आहेत.

अमेय वाघ, क्षिती जोग आणि सिद्धार्थ चांदेकर ट्रॅक्टरवर बसलेले दिसत असून अमेय वाघने मुंडावळ्या बांधलेल्या आहेत. मागे घरही कुठल्यातरी मोठ्या समारंभासाठी सजलेले दिसत आहे. त्यामुळे या सोनू, पप्पू आणि तायडीची नेमकी काय कथा आहे आणि त्यात नेमके काय घडणार आहे, हे चित्रपट आल्यावरच कळेल.

या चित्रपटाबाबत दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “हा माझ्या अत्यंत जवळचा विषय आहे. मी जे जगलो, जे पाहिले ते सगळे मी यात मांडायचा प्रयत्न केला आहे. कोणीतरी असे म्हणाले आहे, सिनेमाचा विषय जेव्हा लेखकाच्या आणि दिग्दर्शकाच्या अत्यंत जवळचा असतो, तेव्हा तो प्रेक्षकांच्याही खूप जवळचा होतो. चित्रपट बनवताना ठरवले होते, हा चित्रपट आपल्या गावीच स्वतःच्या शेतात, स्वतःच्या मातीत चित्रीत करायचा आणि विशेष म्हणजे माझ्या लाडक्या टीमसोबत माझी ही इच्छा पूर्ण देखिल झाली. आता हा चित्रपट पूर्ण झाला असून 15 नोव्हेंबर रोजी तो तुमच्या भेटीला येणार आहे.”

Panchak Marathi Movie: बॉलिवूडलाही पडली ‘पंचक’ची भुरळ

निर्माते आनंद एल राय म्हणतात, “फसक्लास दाभाडे’ ही एक अशी कथा आहे, जी भावंडांच्या नात्यातील गुंतागुंत सुंदरपणे मांडते. हा अशा बंधनाचा उत्सव आहे, जिथे प्रेम, शत्रुत्व आणि विनोद आनंदीपणे एकत्र राहतात. हेमंत ढोमे यांनी या अनोख्या भावंडाची कहाणी अतिशय मोहकतेने आणि नातेसंबंधाने जिवंत केली आहे आणि कलर यलो प्रॉडक्शनच्या माध्यमातून ती प्रेक्षकांसमोर आणण्याचा मला अभिमान आहे. मला खात्री आहे की, हा चित्रपट अनेकांना जवळचा वाटू शकतो, ज्याने कधीही भावंडासोबत हे विशेष बंध शेअर केले आहेत.”

निर्माते भूषण कुमार म्हणतात, ”फसक्लास दाभाडे’ नात्यांमधील मानवी भावनांचे अतिशय साधेपणाने चित्रण करणारा सिनेमा आहे. हा चित्रपट त्याच्या मानवी कथानकाद्वारे खोलवर जोडतो. भारतातातील, विशेषतः महाराष्ट्रातील कौटुंबिक जीवन प्रतिबिंबित करणाऱ्या या सिनेमाची दोलायमान संस्कृती आणि हृदयस्पर्शी कथा प्रेक्षकांसमोर दयाळूपणा आणि प्रामाणिकपणा घेऊन येणारी आहे.’

follow us
  • fb
  • instagram
  • youtube