OMG 2 Film : अक्षय कुमारच्या कानाखाली मारणाऱ्याला 10 लाख रुपये; हिंदू संघटना आक्रमक

OMG 2 Film : अक्षय कुमारच्या कानाखाली मारणाऱ्याला 10 लाख रुपये; हिंदू संघटना आक्रमक

OMG 2 film : अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) बहुचर्चित ‘OMG 2’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. काल (11 ऑगस्ट) रोजी हा चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट रिलीज झाल्यापासून या चित्रपटाची बरीच चर्चा सुरू आहे. एकीकडे हा अक्षय कुमारचा सर्वात मोठा चित्रपट असल्याचं सांगितल्या जातं. तर दुसरीकडे चित्रपटातील काही दृश्यांवरून वाद सुरू आहे. या सिनेमातील काही दृश्यांमुळं हिंदू संघटनेच्या भावना दुखावल्याचा आरोप होतो आहे.  ( Hindu organization appeals to give Rs 10 lakh to those who killed Akshay Kumar)

2012 मध्ये आलेल्या OMG चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, अभिनेता पंकज त्रिपाठी आणि अभिनेत्री यामी गौतम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात अक्षय हा भगवान शंकाराची भूमिका साकारत आहे. शाळांमधील लैंगिक शिक्षण या विषयावर आधारित हा चित्रपट समाजातील एका वर्गाच्या भावना दुखावणारा दिसतो. या चित्रपटात अक्षय कुमारच्या भगवान शंकराच्या लूकवर आक्षेप घेण्यात आला आहे.

अक्षयने हिंदू देवतांचा अपमान केल्याचे काही हिंदू संघटनांचे म्हणणे आहे. आग्रा येथील राष्ट्रीय हिंदू परिषदेने अक्षय कुमारच्या कानाखाली मारणाऱ्यास १० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. तर थुंकणाऱ्याला देखील १० लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. या चित्रपटातून अक्षय कुमारने हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे.

प्रधानमंत्री गती शक्ती योजना, 100 लाख कोटींची योजना आहे तरी काय? 

अक्षय कुमारचे पोस्टर जाळले

हिंदू संघटनेचे अध्यक्ष गोविंद पाराशर यांनी हे बक्षीस जाहीर केलं आहे. तर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल आग्रा येथे अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या पोस्टर्सचे दहन केले. यावेळी पाराशर म्हणाले की, अक्षयने चित्रपटात भोलेनाथांच्या दुताची भूमिका साकराली. मात्र, चित्रपटात तो चपला घालून फिरतांना दिसतो. कचोरी खरेदी करतो आणि गलिच्छ तलावात आंघोळ करतो. त्यामुळं हा चित्रपट ‘देवाची प्रतिमा कलंकित करतो’.

OMG 2 वर बंदी घालण्याची मागणी
संघटनेने ‘ओएमजी 2’वर बंदी घालण्याची मागणी केली असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. अमित राय दिग्दर्शित, ‘OMG 2’ जेव्हापासून निर्मात्यांनी त्याचे पोस्टर रिलीज केले आणि CBFC कडे तक्रार केली तेव्हापासून तो वादात सापडला आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र दिले आणि अनेक कट करण्यास सांगितले. 1 ऑगस्ट रोजी, CBFC ने काही बदलांसह चित्रपट मंजूर केला, त्यानंतर चित्रपट काल म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube