एका तासाचे किती घेणार? त्याने डायरेक्ट मॅसेज केला; रातोरात प्रकाशझोतात आलेल्या गिरीजा ओकचा धक्कादायक खुलासा
Girija Oak सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. याचे काही तोटे देखील होत आहेत. त्याबाबत तिने एका मुलाखतीमध्ये एक धक्कादायक खुलासा केला आहे.
How much charge for an hour, he sent a direct message; Girija Oak’s shocking revelation after came into spotlight overnight : मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. याचं कारण म्हणजे तिने इन्स्पेक्टर झेंडे चित्रपटात साकारलेल्या भूमिकेनंतर तिने एका हिंदी वाहिनीला मुलाखत दिली होती. त्यामध्ये तीने विविध विषयांवर चर्चा केली. त्यातील तिची ब्लू साडी आणि लूक यामुळे तिच्या सौंदर्याची प्रचंड चर्चा झाल्याने ती रातोरात नॅशनल क्रश बनली आहे. पण याचे काही तोटे देखील तिला सहन करावे लागत आहेत. त्याबाबत तिने एका मुलाखतीमध्ये एक धक्कादायक खुलासा केला आहे.
काय म्हणाली गिरीजा ओक?
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये सुरू असलेल्या चर्चा आणि विविध फोटोंनंतर मला आजपर्यंत अनेक डीएम्स म्हणजे डायरेक्ट मेसेज आले आहेत. जे अगोदर कधी आले नव्हते. त्यातील काही मेसेजेस समोरच्याचा आदर करण्यासाठी आहेत की, सेक्सुलाईज करण्यासाठी आहेत कळतच नाही. कारण मला एकाने अशाच प्रकारच्या मेसेजमध्ये थेट एका तासाची किंमत काय आहे? असे विचारत रेट विचारला आहे. त्यामुळे या व्हर्च्युअल स्पेसने अत्यंत त्रास होतो. मात्र माझ्या कुटुंबातील अनेक जण या इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्याने अशा प्रकारच्या व्हायरल बातम्या आणि विचित्र कमेंट्सबद्दल त्यांना नवीन वाटत नाही. याबाबत मी माझ्या मुलाची देखील समजूत घातला आहे. कारण त्याला शाळेमध्ये या गोष्टींच्या चर्चांचा सामना करावा लागतो.
लग्न लांबणीवर, कथित चॅट व्हायरल; स्मृती-पलाशच्या विवाहाबाबतच्या ‘त्या’ चर्चा खऱ्या की खोट्या
याअगोदर देखील गिरीजाने एक खंत व्यक्त केली होती. ज्यामध्ये ती म्हणाली होती की, व्हायरल झाल्यावर आनंद झाला पण अनेकजण गैरवापर करून काही फोटो मॉर्फ करत आहेत. माझ्या 12 वर्षांच्या मुलाने माझा तसा मॉर्फ केलेला फोटो पाहिला तर मी त्याला समजावून सांगू? चुकीचे फोटो व्हायरल करू नका. तीव्र नाराजी व्यक्त करत अशी विनंती देखील तिने त्यावेळी केली होती.
