Indrayani:’इंद्रायणी’ मालिका उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली; संतोष जुवेकर देणार पाठीराखा बनून इंदूची साथ

Indrayani:’इंद्रायणी’ मालिका उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली; संतोष जुवेकर देणार पाठीराखा बनून इंदूची साथ

Santosh Juvekar Indrayani: आपल्या लाडक्या कलर्स मराठी (Colors Marathi)वाहिनीवरील ‘इंद्रायणी’ (Indrayani Serial )मालिका महाराष्ट्राच्या घराघरांत जाऊन पोहोचली आहे. (Marathi Serial) या मालिकेत इंदूची भूमिका करणारी बालकलाकार सांची भोईर सध्या लक्षवेधी ठरत आहे. (Santosh Juvekar) तसेच अभिनेत्री अनिता दाते (Anita Date) आणि संदीप पाठक (Sandeep Pathak) या मालिकेत आपल्या अनोख्या अभिनयाने रसिकांना थक्क करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by @colorsmarathi


‘इंद्रायणी’ ही मालिका आता अनोख्या वळणावर आली आहे. एकीकडे इंदू दिग्रसकर वाड्यात राहायला जात आहे. तिथे ती प्रत्येक कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. तर दुसरीकडे इंदूच्या सतत पाठीशी असलेले तिचे लाडके व्यंकू महाराज यांची तब्येत बिघडत चालली असून इंदूला महाराजांची काळजी लागली आहे. एका साधू बाबांनी सांगितल्या प्रमाणे इंदू व्यंकू महाराजांना वाचवण्याकरता मोठी कसोटी पार पाडेल. 10 जूनपासून इंदूचा नवीन प्रवास सुरू होणार.

साधू बाबांनी इंदूला जी संजीवनी सांगितली होती इंदू आता त्याच संजीवनीच्या शोधात आळंदीला जाण्याचे ठरवते. पण तिने निवडलेला हा अनोखा प्रवास खूपच खडतर असणार यात काही शंका नाही. पैसे अपुरे असताना आणि कसली माहिती नसताना तिचा हा आळंदीचा अनोखा प्रवास कसा होणार आहे. शिवाय तिच्या या खडतर प्रवासामध्ये पाठीराखा म्हणून साथ देणाऱ्या व्यक्तीची भूमिका संतोष जुवेकर साकारणार आहेत . आता हे दोघे मिळून हा प्रवास कसा पार पाडणार आहेत, या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Indrayani: चाफा बोलेना इंद्रायणीची नवी झलक प्रेक्षकांच्या भेटीला

‘इंद्रायणी’ या मालिकेतील इंदूची जबरदस्त इच्छाशक्ती आणि तिचा हा आळंदीचा खडतर प्रवास … इंदूला व्यंकू महाराजांसाठी संजीवनी मिळवून देईल?? तिचं आराध्य दैवत असलेले श्री विठूमाऊली तिला कशी कशी साथ करतील, हे पाहायला विसरू नका…. दररोज संध्याकाळी 7 वाजता , फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही जिओ सिनेमावर पाहता येणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube