नाटू-नाटूला गोल्डन ग्लोब देणाऱ्या कमिटीमध्ये मराठी माणसाची निवड

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 06T125238.935

Narendra Bandabe :  प्रख्यात सिने पत्रकार व समीक्षक नरेंद्र बंडबे यांची आंतरराष्ट्रीय गोल्डन ग्लोब पुरस्काराचे मतदार म्हणून निवड झाली. नरेंद्र यांनी मुद्रित आणि दृकश्राव्य माध्यमातून सेवा दिली आहे. याखेरीज नुकतेच प्रकाशित झालेल्या हॉलिवूड दिग्दर्शक स्टॅन्ली कुब्रिक यांच्या आयुष्यावर आधारीत ‘कुब्रिक’ या पुस्तकाचे ते लेखक आहेत. नरेंद्र बंडबे यांच्या या निवडीमुळे मराठी माणासाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

गोल्डन ग्लोब पुरस्काराच्या आंतरराष्ट्रीय मतदार म्हणून नरेंद्र बंडबे यांची निवड झाली आहे. यंदाचे पुरस्काराचे हे 81 वे वर्ष आहे. बंडबे हे जागतिक सिनेमांवर मराठीमध्ये लिहीत असतात. त्यांच्या लेखनीतून ते आंतरराष्ट्रीय सिनेमांवर मराठीमध्ये भाष्य करत असतात. त्यामुळे मराठी वाचकाला आंतरराष्ट्रीय सिनेमाची माहिती होते.

State Government cultural awards : ठरलं ! 2020-21 या वर्षाचे राज्य सरकारचे सांस्कृतिक पुरस्कार जाहीर

या पुरस्कारासाठी गेल्या वर्षी जगभरातून 103 पत्रकारांची मतदार म्हणून निवड करण्यात आली होती. त्यात भारतातून फक्त मीनाक्षी शेड्डे यांचा समावेश झाला होता. यावर्षी त्यामध्ये बंडबे यांच्या नावाचा समावेश झाला आहे. सध्या गोल्डन ग्लोबचे 200 पेक्षा जास्त मतदार जगभर पसरलेले आहेत.

Gautami Patil Dances Video: ‘घुंगरु’ घेऊन गौतमी पाटील लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर

द हॉलीवूड फॉरेन प्रेस असोशिएशन यांच्याकडून हा पुरस्कार देण्याता येतो. 1944 पासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो आहे. ज्यासाठी जगातील 62 देशातून मतदार हे मतदान करत असतात. यातून सिनेमा आणि टेलिव्हिजन क्षेत्रासाठीचे पुरस्कार देण्यात येतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube