Rajinikanth: थलायवाच्या ‘जेलर’ सिनेमासाठी दक्षिणेतील ऑफिसला सुट्टी; कर्मचाऱ्यांना मोफत तिकीटांचे वाटप

Rajinikanth: थलायवाच्या ‘जेलर’ सिनेमासाठी दक्षिणेतील ऑफिसला सुट्टी; कर्मचाऱ्यांना मोफत तिकीटांचे वाटप

jailer : मनोरंजन विश्वातील सर्वांचा लाडका सुपरस्टार थलायवा म्हणजेच रजनीकांत यांच्या ‘जेलर’ (jailer) या सिनेमाचा ट्रेलर नुकताच आउट करण्यात आला आहे. हा ट्रेलर बघून थलायवा यांचे चाहते फारच खुश झाल्याचे पाहायला मिळत आहे. थलायवा यांच्या लूकपासून ते स्टाईलपर्यंत त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक होत असल्याचे पाहायला आहे. ‘जेलर’मध्ये थलायवाची या नावाची जादू आणि एकूणच त्यांचा हटके अंदाज त्यांच्या चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे असं ट्रेलरवरुन स्पष्ट होत असल्याचे दिसत आहे.

सिनेमाची कथा एका जेलरची आहे, ज्याच्या तुरुंगात एका कुविख्यात टोळीमधील एका मोठ्या गुंडाला कैद करण्यात आले आहे. त्या टोळीतील माणसे जेलरच्या म्हणजेच थलायवा (रजनीकांत) तुरुंगातून त्याची सुटका करण्यासाठी एक योजना आखतात अन् त्यांचा जेलरशी सोबत होत असलेला सामना असं थ्रील आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणार आहे. जेलर मुथुवेल म्हणजेच थलायवा खूप कठोर तितकेच परंतु प्रामाणिक असल्याचे पाहायला मिळत आहे. पण त्यांची दुसरी एक बाजू आहे ही खूपच भयानक असलयाचे पाहायला मिळत आहे.

परंतु याबद्दल त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला माहिती नसते. केवळ दक्षिणेतच नव्हे तर जगभरातील थलायवा यांच्या आगामी सिनेमासाठी चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बेंगलोर आणि चेन्नईमधील बऱ्याच ऑफिससमधील कामगारांना १० ऑगस्ट यादिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. एवढेच नाही तर काही कंपन्यांनी तिथे काम करणाऱ्या सहकाऱ्यांना सिनेमाचे फ्रीमध्ये तिकीट देखील देण्यात आले आहे.

Subhedar Trailer: पाहायला मिळणार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा सुवर्ण इतिहास; ‘सुभेदार’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

पायरसीला आळा घालता, यासाठी काही कंपन्यांनी मोफत तिकटं वाटप करण्याचे निर्णय घेतले आहे. तर काही कर्मचाऱ्यांच्या आणि कंपनीच्या ट्विटर हॅंडलवर याविषयी माहिती आपल्याला बघायला आणि वाचायला मिळत आहे. ‘जेलर’मध्ये थलायवा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. या सिनेमात तमन्ना भाटिया आणि ‘बाहुबली’ सिनेमात शिवगामी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री रम्या कृष्णन या दोघींच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाचे नाव अगोदर ‘थलैवर १६९’ असे ठेवण्यात आले होते. परंतु निर्मात्यांनी नंतर ‘जेलर’ हे नाव फिक्स करून टाकले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube