जेम्स कॅमेरून यांच्याकडून ‘आरआरआर’चे कौतुक, राजामौलींच ट्विट
मुंबई : गोल्डन ग्लोब्स अॅवॉर्ड 2023 मध्ये जिंकल्यानंतर दाक्षिणात्य चित्रपट ‘आरआरआर’ ने देशाची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली आहे. आरआरआर या चित्रपटाला आता क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्समध्येही बेस्ट फॉरेन लॅंग्वेज त्याचबरोबर चित्रपटातील ‘नाचो नाचो’ या गाण्याला देखील बेस्ट ओरिजनल सॉन्ग हे अॅवॉर्ड मिळाले आहे.
त्याच बरोबर या चित्रपटाचं जगभरातून कौतुक होत असताना हॉलिवूडचे मोठे दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी देखील या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. याबद्दल स्वतः ‘आरआरआर’ चे दिग्दर्शक राजामौली यांनी ट्विट करत माहिती दिली. ‘क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड’च्या सोहळ्यात जेम्स कॅमेरून यांनी राजामौली यांची भेट घेऊन त्यांच्या चित्रपटाविषयी बरीच चर्चा केली. खुद्द राजामौली यांनी जेम्स यांच्याशी गप्पा मारतानाचे फोटोज शेअर करत पोस्ट केली आहे.
The great James Cameron watched RRR.. He liked it so much that he recommended to his wife Suzy and watched it again with her.🙏🏻🙏🏻
Sir I still cannot believe you spent a whole 10 minutes with us analyzing our movie. As you said I AM ON TOP OF THE WORLD… Thank you both 🥰🥰🤗🤗 pic.twitter.com/0EvZeoVrVa
— rajamouli ss (@ssrajamouli) January 16, 2023
या पोस्टमध्ये दिग्दर्शक राजामौली म्हणाले की, ‘द ग्रेट जेम्स कॅमेरून यांना आरआरआर हा चित्रपट एवढा पसंत पडला की त्यांनी त्यांच्या पत्नीला तो बघायला सांगितला आणि तिच्याबरोबर त्यांनीही तो दुसऱ्यांदा पाहिला. माझा अजूनही विश्वास बसत नाहीये की तुम्ही आमच्याशी या चित्रपटाबद्दल तब्बल १० मिनिटं चर्चा केली. तुमचे खूप खूप आभार.’
राम चरण आणि ज्युनियर एनटीआरच्या शिवाय,’आरआरआर’ मध्ये अजय देवगन, आलिया भट, श्रिया सरन, समुथिरकानी, रे स्टीवेन्सन, एलिसन डूडी आणि ओलिविया मॉरिसही आहे. हा चित्रपट दोन वास्तविक जीवनातील भारतीय क्रांतिकारक, अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या काल्पनिक मैत्री आणि ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या त्यांच्या लढ्याभोवती केंद्रित आहे.