Ulajh Trailer: जान्हवीच्या आगामी ‘उल्झ’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, ‘या’ दिवशी रिलीज होणार

Ulajh Trailer: जान्हवीच्या आगामी ‘उल्झ’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, ‘या’ दिवशी रिलीज होणार

Ulajh Trailer Released: जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही बॉलिवूडची (Bollywood) सुंदर अभिनेत्री मानली जाते. ती अनेकदा तिच्या लूकमुळे जोरदार चर्चेत असते. जान्हवीने सोशल मीडियावर (Social Media) किलर लूकने भरलेले अनेक फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीने नुकतचं अनंत अंबानीच्या लग्नाचा कार्यक्रमातील काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा लूक सोशल मीडियावर चर्चेत राहिला. आता ही अभिनेत्री ‘उलझ’ सिनेमासाठी चर्चेत आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)


जान्हवी कपूरचा ‘मिस्टर अँड मिसेस माही’ (Mr and Mrs Mahi) यावर्षी रिलीज झाला, ज्याला बॉक्स ऑफिसवर मोठा प्रतिसाद मिळाला. आता यावर्षी तिचा दुसरा चित्रपट ‘उलज’ (Ulajh Movie) प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पुढच्या महिन्यात थिएटरमध्ये दाखल होतोय. सोमवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रिव्ह्यू ठेवण्यात आला होता, ज्यामध्ये ‘उलज’ची स्टारकास्ट पाहायला मिळाली. यावेळी जान्हवीच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

जान्हवी कपूर ‘उलज’च्या प्रिव्ह्यूला पोहोचली

चित्रपटाचा ट्रेलर पूर्वावलोकन मुंबईत आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये संपूर्ण स्टार कास्ट सहभागी झाली होती. या कार्यक्रमात जान्हवी कपूर खास बॉडीकॉन ड्रेसमध्ये पोहोचली होती. ब्लॅक शर्ट-व्हाइट स्कर्ट टाईप स्टायलिश ड्रेसमधील जान्हवीच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या लूकसह अभिनेत्रीने आपले केस मोकळे ठेवले होते. शिवाय कमीत- कमी मेकअप केला होता. चित्रपटाच्या इतर कलाकारांनीही प्रिव्ह्यूला हजेरी लावली. ‘उलज’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. जान्हवीने पोस्ट शेअर करत म्हटले की, चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच 16 जुलै रोजी येईल. हा चित्रपट 2 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Janhvi Kapoor : जान्हवी कपूरच्या ग्लॅमरस लूकची चर्चा

जान्हवीला पाहून लोकांना उर्फीची आठवण

जान्हवी कपूरच्या या लूकमध्ये अनेकांना उर्फी जावेदची आठवण झाली. उर्फीने काही दिवसांपूर्वी परिधान केलेला हा तोच ड्रेस आहे, अशी चर्चा होताना पाहायला मिळाली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube