Kalki 2898 AD वर पहिल्याच दिवशी पैशांचा पाऊस; प्रभासच्या नावे नवं रेकॉर्ड तर निर्मात्यांची चांदी

Kalki 2898 AD वर पहिल्याच दिवशी पैशांचा पाऊस; प्रभासच्या नावे नवं रेकॉर्ड तर निर्मात्यांची चांदी

Kalki 2898 AD 1st day box office collection : प्रभास, (Prabhas) अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण और कमल हासन स्टारर ‘कल्की 2898 एडी’ (Kalki 2898 AD) या वर्ष 2024 चा बहुप्रतिक्षित चित्रपट बद्दल बरीच चर्चा होती. गुरूवारी (27 जून) अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ( box office) रेकॉर्डतोड कमाई केली आहे.

सोन्या-चांदीचं नक्षीकाम अन् मंत्रघोष जाणून घ्या अनंत-राधिकाच्या लग्नपत्रिकेच्या खास गोष्टी

या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी हिंदी, तमिळ,तेलुगु, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये जवळपास 95 कोटींची कमाई केली. तर चित्रपटाची एकूण कमाई 115 कोटी झाली आहे. तर जगभरात या चित्रपटाने तब्ब्ल 180 कोटींचा गल्ला जमवला आहे. या कमाईसह या चित्रपटाने नवं रेकॉर्ड बनवलं आहे. मात्र अद्यापही आरआरआर आणि बाहुबली 2 च्या पहिल्या दिवशीचं रेकॉर्ड हा चित्रपट तोडू शकलेला नाही. कारण आरआरआरने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 223 कोटींची कमाई केली होती. तर बाहुबली 2 ने 217 कोटींची कमाई केली होती.

लोकसभा गाजली पण, PM पदाची खुर्ची हुकली; 14 विरोधी पक्षनेत्यांपैकी एकालाच संधी

दरम्यान फार पूर्वीच चित्रपटाची आगाऊ बुकिंग परदेशासह भारतातही सुरू झाली होती. ॲडव्हान्स बुकिंगने साऊथमध्ये रेकॉर्ड तोडले आहेत. बॉलीवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, अनेक चाहते सोशल मीडियावर तक्रार करत होते. की जेव्हा ते दक्षिणेत तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा साइट क्रॅश झाली. हे पाहता हा चित्रपट अनेक विक्रम मोडणार हे ठरलेलेच होते. रिपोर्ट्सनुसार, हैदराबादसारख्या शहरात प्रचंड ॲडव्हान्स बुकिंग दिसून आले आहे. हा चित्रपट 600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचे उत्तम कलेक्शन होण्याची अपेक्षा आहे.

‘कल्की 2898 AD स्टार कास्ट

‘कल्की 2898 एडी’ हा एक पौराणिक साय-फाय चित्रपट आहे. या चित्रपटात प्रभासने शिकारी भैरवची भूमिका साकारली आहे. अमिताभ बच्चन यांनी अश्वत्थामा तर कमल हसन यांनी सुप्रीम यास्किनच्या रुपात खलनायकाची भूमिका साकारली आहे. दीपिका पदुकोण SUM-80 च्या भूमिकेत आहे तर दिशा पटानी रॉक्सीच्या भूमिकेत आहे. चित्रपटात शाश्वत चॅटर्जी. ब्रह्मानंदम, पशुपती, कीर्ती सुरेश यांच्यासह अनेक कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘कल्की 2898 एडी’ नाग अश्विन यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केले आहे. हा चित्रपट वैजयंती मुव्हीज बॅनरखाली बनवण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज