अमिताभ आणि प्रभास यांच्यातील जबरदस्त ॲक्शन सीक्वेन्स; ‘कल्की 2898 एडी’चा दुसरा ट्रेलर रिलीज

अमिताभ आणि प्रभास यांच्यातील जबरदस्त ॲक्शन सीक्वेन्स; ‘कल्की 2898 एडी’चा दुसरा ट्रेलर रिलीज

Kalki 2898 AD Second Trailer Released Out: ‘कल्की 2898 एडी’ (Kalki 2898 AD ) हा 2024 मधील सर्वात प्रतिक्षित चित्रपट आहे. (Kalki 2898 AD Trailer) पोस्टरपासून ट्रेलरपर्यंत आणि नंतर मोठ्या बजेट आणि मोठ्या स्टारकास्टसह या चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटने ‘कल्की 2898 एडी’ बद्दल बरीच चर्चा केली आहे. या सगळ्यात आता निर्मात्यांनी ‘कल्की 2898 एडी’चा दुसरा ट्रेलर रिलीज करून चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे. दुसऱ्या ट्रेलरमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), दीपिका पदुकोण, प्रभास (Prabhas) आणि कमल हासन यांच्या व्यक्तिरेखा अधिक तपशीलवार दाखवण्यात आल्या आहेत. दोन मिनिटांपेक्षा जास्त असलेला ट्रेलर कल्कीचे जग आणि त्याचे कथानक प्रकट करत आहे.

‘कल्की 2898 एडी’ चा दुसरा धमाकेदार ट्रेलर रिलीज

‘कल्की 2898 एडी’चा दुसरा ट्रेलर अमिताभ बच्चनच्या अश्वत्थामाच्या पात्राने सुरू होतो, जो दीपिका पदुकोणच्या व्यक्तिरेखेला शत्रूंपासून वाचवताना दिसतो आणि म्हणतो, “संपूर्ण सृष्टी देवामध्ये वास करते आणि देव स्वतः तुमच्यामध्ये आहे. यानंतर दीपिकासह इतर पात्रे छोट्या छोट्या संवादांसह वेगवेगळ्या दृश्यांमध्ये दिसत आहेत.

प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्यातील भांडणही ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. अनेक दृश्यांनंतर कमल हसनच्या व्यक्तिरेखेचेही अनावरण करण्यात आले. कमल हसनला ओळखणे अवघड आहे. ते म्हणतात, “पिढ्यानपिढ्या अनंत संधी असूनही माणूस बदलला नाही आणि बदलणार नाही.” एकूणच दुसऱ्या ट्रेलरमध्ये कल्कीच्या दुनियेची झलक पाहायला मिळाली आहे. 2 मिनिटे 22 सेकंदांच्या या ट्रेलरनंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवेल असे दिसत आहे.

‘कल्की 2898 एडी’ च्या पहिल्या ट्रेलरला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद

नाग अश्विन दिग्दर्शित चित्रपटाचा ट्रेलर 1 गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. ज्यामध्ये चित्रपटातील खलनायक दीपिका पदुकोणच्या पोटात वाढणाऱ्या मुलाचा जीव घेऊ इच्छित असल्याचे दिसून आले. भैरवच्या भूमिकेत प्रभासला दीपिकाचे पात्र शोधून तिला परत आणण्याची जबाबदारी येते, तर अश्वत्थामाच्या भूमिकेत अमिताभ बच्चन दीपिकाची ढाल बनतात. पहिल्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.

Kalki 2898 AD: प्रभास- दिलजीतच्या ‘कल्की 2898 एडी’चे पहिले धमाकेदार गाणे रसिकांच्या भेटीला

‘कल्की 2898 एडी’ कधी रिलीज होणार?

वैजयंती मुव्हीज बॅनरचा ‘कल्की 2898 एडी’ हा मोठ्या बजेटमध्ये बनलेला चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट 600 कोटी रुपये खर्चून बनवण्यात आला असून यासोबतच हा देशातील सर्वात महागडा चित्रपट ठरला आहे. ‘कल्की 2898 एडी’ बाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. हा चित्रपट 27 जून रोजी जगभरात हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि इंग्रजी या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन, दिशा पटानी यांच्यासह अनेक कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube