बॉक्स ऑफिसवर मागे पडतोय कतरिनाचा ‘मेरी ख्रिसमस’, सिनेमागृहात ’12 वी फेल’चे राज्य

बॉक्स ऑफिसवर मागे पडतोय कतरिनाचा ‘मेरी ख्रिसमस’, सिनेमागृहात ’12 वी फेल’चे राज्य

Merry Christmas Box Office Collection Day 5: कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांचा चित्रपट ‘मेरी ख्रिसमस’ (Merry Christmas Movie) अखेर खूप प्रतिक्षेनंतर पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. 12 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला पण चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळत नाहीये. (Box Office Collection) कतरिनाचा चित्रपट प्रदर्शित होऊन 5 दिवस झाले असून या 5 दिवसांत चित्रपटाची कमाई केवळ 12-13 कोटींवर आली आहे. असे असताना ‘मेरी ख्रिसमस’ सोबत कोणताही नवीन बॉलिवूड चित्रपट पडद्यावर प्रदर्शित झालेला नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)


Sacknilk च्या रिपोर्टनुसार, ‘मेरी ख्रिसमस’ ने पहिल्या दिवशी 2.45 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी क्राईम थ्रिलर चित्रपटाचे कलेक्शन 3.45 कोटी रुपये होते तर तिसऱ्या दिवशी चित्रपटाने 3.83 कोटी रुपयांची कमाई केली होती. चौथ्या दिवशी ‘मेरी ख्रिसमस’च्या व्यवसायात घसरण झाली आणि चित्रपट 1.65 कोटी रुपयांपर्यंत मर्यादित राहिला. आता, पाचव्या दिवसाच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने आतापर्यंत 1.15 कोटींची कमाई केली आहे. अशा प्रकारे ‘मेरी ख्रिसमस’चे एकूण कलेक्शन 12.53 कोटी रुपये झाले आहे.

श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘मेरी ख्रिसमस’मधून विजय थलपथी आणि कतरिना कैफ पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसले आहेत. यापूर्वी विजय शाहरुख खानसोबत ‘जवान’ चित्रपटातही दिसला होता. विजयने चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला होता.

‘बाबरी मशीद पाडल्यापासून ते आणीबाणी! ‘मैं अटल हूं’ चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज

पडद्यावर कॅटरिनाची जादू चालत नाही? कतरिना कैफ मनीष शर्माच्या ‘टायगर 3’मध्ये सलमान खानसोबत दिसली होती. कतरिनाचा हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर कोणतेही रेकॉर्डब्रेक कलेक्शन करू शकला नाही आणि आता ‘मेरी ख्रिसमस’चीही दुरवस्था झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube