KBC 15 Promo: बिग बी यांच्या ‘कौन बनेगा करोडपती 15’ चा नवा प्रोमो एकदा पाहाच…
KBC 15 Promo: बॉलीवूडचे बादशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) म्हणजेच बिग बी यांनी होस्ट केलेला क्रेझी शो ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati 15) हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो आहे. त्याचा प्रत्येक सीझन हिट झाला आहे. आणि पुन्हा एकदा बिग बी (Big B) त्यांच्या सुपरहिट शोचा १५वा सीझन घेऊन येत आहेत. विशेष म्हणजे यावेळी ‘कौन बनेगा करोडपती’ नवीन मज्जा आणि नवीन ट्विस्ट घेऊन टीव्हीवर येणार आहे. चॅनलने KBC 15 चा एक नवीन प्रोमो देखील जारी केला आहे.
View this post on Instagram
सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने ‘KBC 15’ चा नवीन प्रोमो रिलीज केला आहे. व्हिडीओमध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन म्हणजेच बिग बी “बदल रहा है, देखो सब कुछ बदल रहा है, बडे ग्यान से, बडे शान से सब कुछ बदल रहा है” असे म्हणत असल्याचे दिसून येत आहे. यानंतर प्रोमो व्हिडिओच्या सुरुवातीला, लहान व्यवसायांच्या यशाबद्दल देखील बोलत असल्याचे दिसून आले आहेत. आज लोक त्यांच्या मोबाईल फोनच्या एका क्लिकवर विविध पदार्थ ऑर्डर करु शकतात. टेक्नोलॉजीमुळे कुटुंबं कशी जवळ आली आहेत, हे ‘KBC 15’ च्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे.
तसेच प्रोमोच्या शेवटी अमिताभ बच्चन म्हणतात की जेव्हा एखादा देश बदलतो आणि विकसित होतो तेव्हा ते प्रगतीचे लक्षण असते. त्यांनी असा दावाही केले आहेत की KBC बदलत आहे, जे या वर्षी अधिक टेक्नो-सेव्ही सीझन दर्शवणार आहे. या हंगामात कोणते बदल होणार आहेत, याबद्दल निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे.
Ravi kishan: सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्याची लेक होणार भारतीय सैन्यात भरती; जाणून घ्या तिच्याबद्दल
कौन बनेगा करोडपती 15 साठी नोंदणी एप्रिलमध्ये सुरू झाली होती. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सूत्रांनी माहिती दिली आहे की, शोचे शूटिंग पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे, तसेच ऑगस्टपर्यंत तो पडद्यावर येईल.अमिताभ बच्चन 2000 मध्ये पहिल्या सीझनपासून शो होस्ट करत आहेत. फक्त तिसरा सीझन शाहरुख खानने होस्ट केला होता.