Maharashtra Shaheer येताच केदार शिंदेंच्या आगामी चित्रपटाचा टिझर रिलीज

Untitled Design   2023 04 28T141617.801

Kedar Shindes Upcoming Films Teaser release : मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस आले आहेत. गेल्या काही वर्षापासून मराठीत अनेक दर्जेदार चित्रपट बनत आहेत. मराठी प्रेक्षकही चित्रपटांना भरभरून प्रतिसाद देत आहेत. आताही असाच एक बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ ​​महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारीत ‘महाराष्ट्र शाहीर’ (‘Maharashtra Shaheer’) हा चित्रपट आहे. आज २८ एप्रिल रोजी, केदार शिंदे यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘महाराष्ट्र शाहीर’ महाराष्ट्रभरात रिलीज झाला.

शाहीर साबळे यांच्या जीवनावर केदार शिंदे ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट करत असून त्यामध्ये अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळे यांच्या भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचे संगीत अजय अतुल करत आहे. या चित्रपटाचे संगीत प्रेक्षकांमध्ये कमालीचे लोकप्रिय झाले आहे. त्यातील अनेक गाणी चाहत्यांच्या आवडीची आहेत. त्यावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रिल्स व्हायरल झाले आहेत.

‘हाच खरा टर्निंग पॉइंट’ ; खर्गेंच्या वक्तव्यावर भाजप खासदाराने केलं मोठं भाकित

त्यानंतर आता बहुप्रतिक्षित चित्रपट ‘महाराष्ट्र शाहीर’ महाराष्ट्रभरात रिलीज झाला याच खास मुहूर्तावर केदार शिंदेंच्या आगामी चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. ‘बाईपण भारी देवा’ असं या चित्रपटाचं नाव आहे. ‘बाईपण भारी देवा’ आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीच्या विश्वाभोवती फिरणाऱ्या आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा साऱ्यांच्या भावना शेअर करणारा आहे. अर्थात चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं असलं तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरंच काही सांगून जाणार आहे.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे-अजित भुरे सह-निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट आहे. सिनेमाचं नाव जसं भारी भरकम आहे तशीच सिनेमातील स्टारकास्टही तगडी आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते,सुकन्या मोने,शिल्पा नवलकर,सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशा मातब्बर अभिनेत्री एकत्र पडद्यावर पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. ‘बाईपण भारी देवा’ हा एक कौटुंबिक चित्रपट असून प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करण्यासाठी 30 जून 2023 ला चित्रपटगृहात आपल्या भेटीस येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube