आता खुपणार नाही टोचणार; ‘खुपते तिथे गुप्ते शो’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 28T155352.482

Khupte Tithe Gupte :  झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध कार्यक्रम ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम आपल्याला आठवतंच असेल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक राजकारणी, सेलिब्रिटी यांचे अनुभव ऐकले आहेत. प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते हा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षक या कार्यक्रमाची वाट पाहत होते.

पण आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आहे. पुन्हा एकदा हा कार्यक्रम झी मराठी वाहिनीवर सुरु होणार आहे. याबाबतचा एक प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये फक्त कार्यक्रमाचे नाव व अवधूत गुप्ते यांच्या आवाजात काही संवाद आहेत. आता प्रश्नांची धार वाढणार खुपणार नाही टोचणार, असा संवाद या प्रोमोला देण्यात आला आहे.

या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या सीझनमध्ये कोणकोणते प्रमुख पाहुणे या कार्यक्रमामध्ये पहायला मिळणार याबाबत अनेक चर्चा केल्या जात आहेत. या अगोदर जेव्हा हा कार्यक्रम झाला होता तेव्हा अनेक सेलिब्रिटी कलाकारांसह अनेक राजकीय मंडळी देखील या कार्यक्रमात आले होते.

Mauritius दौऱ्यात फडणवीसांचे नव्या स्टाईलचे जॅकेट

यामध्ये छगन भुजबळ, नारायण राणे, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आदी नेते मंंडळी या कार्यक्रमामध्ये आली होती. आता एवढ्यावर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. राजकारणात अनेक नवे नेतेमंडळी समोर आली आहेत. त्यामुळे कोण-कोण या कार्यक्रमाला हजेरी लावणार याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत.

सत्तार भावनिक माणूस, सत्तारांच्या वक्तव्यावर विखेंचं स्पष्टीकरण

Tags

follow us