चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट चर्चेत; म्हणाला, ‘मी ब्राह्मण, तो कासार..’

चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट चर्चेत; म्हणाला, ‘मी ब्राह्मण, तो कासार..’

Kiran Mane on Chinmay Mandlekar wife Video : काल अभिनेता चिन्मय मांडलेकरने (Chinmoy Mandlekar) सोशल मीडियावर (social media) व्हिडीओ शेअर करत यापुढे शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही, असं मत मांडलं आहे. चिन्मय यांनी त्यांच्या लेकाचं नाव जहांगीर ठेवलं यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. चिन्मय आणि त्यांची पत्नी नेहा यांनाही वाईटसाईट प्रतिक्रियांचा सामना करावा लागला आहे. आता याविषयी अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांची पोस्ट जोरदार चर्चेत आली आहे.


“किरण माने तुम्ही मराठा आहात. तुम्हाला लोकांचा एवढा सपोर्ट मिळतोय. ‘मराठा कार्ड’ वापरा. सोपी होईल लढाई.” एका राजकीय नेत्याने मला सल्ला दिला होता. आधीच सांगतो, ते नेते शरद पवारसाहेब किंवा जितेंद्र आव्हाड नव्हते. वेगळ्याच पक्षातले नेते होते, जे सध्या सत्ताधार्‍यांच्या वळचणीला गेलेले आहेत. त्यांनी संबंध नसताना असाच फोन करुन सल्ला दिला होता.

दोन वर्ष उलटून गेली याला. त्यावेळी माझ्या विरोधात अंधभक्तांनी ट्रोलींग केले होते आणि स्टार प्रवाहच्या पेजवर जाऊन ‘किरण मानेला सिरीयलमधून काढा’ असा धिंगाणा घातला होता… प्रचंड अर्वाच्य शब्दांत ट्रोलींग झालं. त्यानंतर अचानक मला सिरीयलमधून काढून टाकलं गेलं. मी याविरोधात लढायचा निर्णय घेतला. जनतेतून मला प्रचंड सपोर्ट मिळाला. त्यावेळची ही गोष्ट.

त्या नेत्याचं म्हणणं होतं की अशावेळी मराठा जातीचा आधार घेऊन लढणं, दबाव वाढवण्यासाठी खुप सोयीचं ठरलं असतं… कदाचित ते खरंही असावं… पण मला ते अजिबात मान्य नव्हतं. मी म्हणालो, मी जातीच्या कुबड्या वापरणार नाही. यात विनाकारण जात आणणं हे समाजात भेद निर्माण करणारं ठरलं असतं. माझी लढाई न्यायाची आणि संवैधानिक मुल्यांची आहे. मी प्रामाणिक आहे, सत्य माझ्या बाजूने आहे. मी माझी लढाई स्वबळावर लढणार… आणि ती लढलोसुद्धा. माझ्यावर आरोप करणारे आज कुठेही नाहीत. मी मात्र ताठ मानेनं ठामपणे उभा आहे.

परवा चिन्मय मांडलेकरवर त्या मानाने खुप छोटंसं, किरकोळ ट्रोलींग झालं. खरंतर तेही चुकीचंच होतं. पण आजकाल जनरली जे होतं त्या तुलनेत खुपच सौम्य होतं. पण त्यानंतर त्याच्या पत्नीने प्रतिक्रिया देताना, “मी ब्राह्मण आहे आणि तो कासार आहे. आम्ही हिंदू आहोत.” हे सांगणं फार भयानक होतं. सिंपथीसाठी असेल किंवा रागाच्या भरात असेल, पण हा वाद भलत्याच दिशेला नेणारं आणि असंबद्ध होतं. ट्रोल्सच्या हेतुंना बळकटी देणारं होतं.

धर्मांध अंधभक्तांचे ट्रोलींग हे फोफावणार्‍या आगीसारखे झाले आहे. हळूहळू सगळेच होरपळणार आहेत यात. कुणाचीच सुटका नाही. त्यातून सुटका हवी असेल तर या ट्रोल्सना राक्षसी बळ देणार्‍या शक्तीला दणका देणं. चिन्मयच्या प्रकरणातला एक मुद्दा महत्त्वाचा आहे, ‘त्याने मुलाचे नांव २०१३ साली ठेवले. त्यावेळी तो अजिबात ट्रोल झाला नव्हता. पण आज या मुद्यावर शिवीगाळ होते आहे.’

MyLek: मायलेकींच्या नात्यात दुरावा? ‘मायलेक’ मधील ‘नसताना तू’ भावनिक गाणे प्रदर्शित

याला म्हणतात ‘संविधान धोक्यात येणं’. या झुंडीनं तुम्हाला तुमच्या मुलाचं नांव ठेवायचं ‘स्वातंत्र्य’ ठेवलेलं नाही. जात आणि धर्म या आपल्या खाजगी गोष्टी चव्हाट्यावर आणून ‘समता’ नष्ट करण्याचे प्रकार सुरू आहेत. ही दोन मुल्यं नसतील तर ‘बंधुता’ निर्माण कशी होणार? बास. एवढंच लक्षात ठेवा आणि मतदान करा. हे ट्रोलींग-बिलिंग बंद करणं तुमच्या स्वत:च्या हातात आहे. थंड घ्या. जय शिवराय… जय भीम ! – किरण माने. सध्या अभिनेत्याची ही पोस्ट खूप चर्चेचा विषय बनला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube